भारतीय अर्थव्यवस्थेत आयपीएलची निर्णायक खेळी

By Admin | Published: October 30, 2015 10:29 PM2015-10-30T22:29:01+5:302015-10-30T22:29:01+5:30

इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो

The IPL's decisive knockout in the Indian economy | भारतीय अर्थव्यवस्थेत आयपीएलची निर्णायक खेळी

भारतीय अर्थव्यवस्थेत आयपीएलची निर्णायक खेळी

googlenewsNext

नवी दिल्ली : इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धेला भारतीय क्रिकेटसाठी सोन्याची कोंबडी मानली जाते. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) किती बक्कळ पैसा मिळतो हे आता वेगळ्या शब्दांत सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. मात्र आता ही सोन्याची कोंबडी केवळ बीसीसीआय पुरता मर्यादित राहिली नसून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी देखील महत्त्वाची ठरत आहे.
यंदा पार पडलेल्या आयपीएलच्या आठव्या सत्राने भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पाडताना जीडीपीमध्ये तब्बल ११
अब्ज ५० करोड रुपयांचे योगदान
दिले आहे. त्यामुळे आयपीएल भारतीय अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरत आहे.
भारताच्या अर्थव्यवस्थेत आयपीएलचा कशाप्रकारे हातभार लागू शकतो यासंबधी सर्वेक्षण करण्यासाठी बीसीसीआयने केपीएमजी स्पोटर््स अ‍ॅडवायजरी कंपनीची नियुक्ती केली होती. या कंपनीने दिलेल्या अहवालाद्वारे
वरील माहिती मिळाली आहे. एप्रिल - मार्च २०१५ मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांतून जीडीपीमध्ये एकूण
२६ अब्ज ५० करोड रुपयांची
भर पडली. यामध्ये फ्रँचाईजी संघ, आयोजक, प्रेक्षक आणि या
स्पर्धेशी जोडलेले विभिन्न रोजगार यांचाही समावेश आहे.
याबाबतीत आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले की, खरं म्हणजे ही खूप आनंदाची आणि प्रोत्साहन देणारी बाब आहे. आयपीएलचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सकारात्कम प्रभाव पडतो याचा आनंद आहे. सुमारे ६० दिवसांच्या स्पर्धेतून जीडीपीमध्ये ११ अब्ज ५० करोड रुपयांचा योगदान होतो, हे स्पर्धेच्या यशस्वीतेचा पुरावा आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेतून देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होत
असून यापुढेही आयपीएलच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्याचा आमचा प्रयत्न असेल. (वृत्तसंस्था)

Web Title: The IPL's decisive knockout in the Indian economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.