आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास

By admin | Published: May 11, 2016 02:42 AM2016-05-11T02:42:09+5:302016-05-11T02:42:09+5:30

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात.

IPL's development of T-20 cricket | आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास

Next

आयपीएलमुळे टी-२० क्रिकेटचा विकास होण्यास मदत मिळत आहे. यंदाची स्पर्धा यापेक्षा वेगळी नाही. या खेळात सातत्याने बदल होत असतात. कर्णधार प्रतिस्पर्धी फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यासाठी सातत्याने गोलंदाजीमध्ये बदल करीत असतो. फलंदाजांना अंदाज येऊ नये, यासाठी गोलंदाजही गोलंदाजी करताना दिशा व टप्पा यामध्ये बदल करीत असतो. टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येक डावाची तीन टप्प्यांत विभागणी होते. १ ते ६ षटकांदरम्यान पॉवर प्ले, ७ ते १५ षटकांदरम्यान मध्य डाव आणि १६ ते २० षटकांदरम्यान डेथ ओव्हर्स. त्यात सहभागी आठ संघ खेळाच्या प्रत्येक विभागात कशा प्रकारची रणनीती वापरतात, याची उत्सुकता आहे. सुरुवातीची सहा षटके गोलंदाजांच्या बचावाची असतात.
क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असताना तुम्ही त्या वेळी धावगतीवर नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करता. काही कर्णधार पॉवर प्लेमध्येही आक्रमक क्षेत्ररक्षण सजवून विकेट मिळवण्यास पसंती देतात. पॉवर प्लेमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवाला मिळणे स्वाभाविक झाले आहे. अशा परिस्थितीत फलंदाजी करणाऱ्या संघाला सुरुवातीपासून रोखणे महत्त्वाचे ठरते.
मधल्या षटकांमध्ये उभय संघ खेळाचे स्वरूप समजून घेण्यास प्रयत्नशील असतात आणि लय मिळवण्याची संधी शोधत असतात. या षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाचे लक्ष स्कोअर वाढविण्यावर असते, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा भर धावा रोखण्यावर असतो. या कालावधीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधारापुढे केव्हा आक्रमक पवित्रा स्वीकारायचा, याचे आव्हान असते. जर आक्रमक पवित्रा स्वीकारला तर विकेट मिळवता येतात आणि मोठी भागीदारीही संपुष्टात आणता येते. योग्य वेळी आक्रमण झाले तर विजय तुमचा आणि निर्णय चुकला तर पराभव निश्चित असतो.
डेथ ओव्हर्स म्हणजे बुद्धिबळाच्या पटाप्रमाणे असतात. तेथे वेगाने चाल खेळणे आवश्यक असते. फलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार करता डेथ ओव्हर्समध्ये पारंपरिक क्रिकेटच्या फटक्यांच्या माध्यमातून धावा वसूल करणे प्रभावी ठरते. गरजेपेक्षा अधिक वेगळा प्रयत्न करून काही चौकार-षटकार वसूल करता येतात, पण त्या प्रयत्नात अधिक डॉट चेंडू खेळले जातात. डावाच्या या टप्प्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा गोलंदाज व कर्णधार यांच्यादरम्यान प्रभावी संवाद असणे आवश्यक ठरते. गोलंदाजी कुठे करायची, हे निश्चित झाल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवता येते. अखेरच्या टप्प्यात फलंदाज बॅट फिरवत असताना रणनीती व योजना कशा अपयशी ठरतात, याबाबत उत्सुकता असते.
अखेर प्रत्येक टप्प्याचा विचार केल्यानंतर शेवटी योजना आखणारा आणि दडपणाखालीही त्या यशस्वी करणारा संघ विजयी ठरतो.
(टीसीएम)

Web Title: IPL's development of T-20 cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.