इराणी चषक, मुंबईचा ६०३ धावांचा डोंगर

By admin | Published: March 7, 2016 08:47 PM2016-03-07T20:47:11+5:302016-03-07T20:47:11+5:30

सुर्यकुमार यादवच्या (१५६) धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर इराणी चषक सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ६०३ धावा डोंगर रचून शेष भारतावर वर्चस्व मिळवले आहे.

Irani Cup, Mumbai 603 runs | इराणी चषक, मुंबईचा ६०३ धावांचा डोंगर

इराणी चषक, मुंबईचा ६०३ धावांचा डोंगर

Next

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ७ - जय बिस्ता पाठोपाठ सुर्यकुमार यादवच्या (१५६) धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर इराणी चषक सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ६०३ धावा डोंगर रचून शेष भारतावर वर्चस्व मिळवले आहे. सुर्यकुमारने शानदार खेळीत २४ चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार आदित्य तरेने ६५ आणि लाडने ६६ धावा करुन त्याला चांगली साथ दिली. 
पहिल्या दिवशी जय बिस्ताच्या (१०४) धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर ३८६ धावा करणा-या मुंबईने दुस-या दिवशी २१७ धावा केल्या. मुंबईच्या ब्रबॉर्न स्टेडियवर सुरु असलेल्या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी शेष भारताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. 
दुस-या दिवसअखेर शेष भारताने सलामीवीर केएस भारतच्या विकेटच्या मोबदल्यात एक बाद ३६ धावा केल्या आहेत. अभिषेक नायरने त्याला १६ धावांवर लाडकरवी झेलबाद केले. दुसरा सलामीवीर फझल (१८ )आणि जयंत यादव (१ )ची जोडी मैदानावर आहे. शेष भारताचा संघ अजूनही ५६७ धावांनी पिछाडीवर आहे. 

Web Title: Irani Cup, Mumbai 603 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.