इराणी ट्रॉफी शेष भारताकडे

By admin | Published: January 25, 2017 12:31 AM2017-01-25T00:31:08+5:302017-01-25T00:31:08+5:30

वृद्धीमान साहाचे द्विशतक (२०३) व चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारत संघाने गुजरातचा सहा गडी राखून पराभव

Irani Trophy Rest of India | इराणी ट्रॉफी शेष भारताकडे

इराणी ट्रॉफी शेष भारताकडे

Next

मुंबई : वृद्धीमान साहाचे द्विशतक (२०३) व चेतेश्वर पुजाराच्या नाबाद ११६ धावांच्या जोरावर शेष भारत संघाने गुजरातचा सहा गडी राखून पराभव करत इराणी ट्रॉफी पटकावली.
साहाने १२३ तर पुजाराने ८३ धावांवरुन आज सुरुवात केली. पुजारा व साहा यांनी पाचव्या गड्यासाठी ३१६ धावांची भागीदारी केली. स्पर्धेच्या इतिहासातील ही दूसऱ्या क्रमांकाची भागीदारी आहे. यापुर्वी रवि शास्त्री व प्रविण आम्रे यांनी १९९० मध्ये शेष भारताविरुद्ध चौथ्या क्रमांकासाठी ३२७ धावांची भागीदारी केली होती.
रणजी विजेत्या गुजरातच्या गोलंदाजांनी या दोन्ही फलंदाजांना विशेष अडचणीत आणले नाही. पहिल्या डावात १३२ धावांची आघाडी घेतलेल्या गुजरातने कठीण लक्ष्य दिले होते. मात्र या दोघांच्या फलंदाजीसमोर हे अवघड लक्ष्य एकदम सोपे बनले. पुजाराने २३० चेंडूचा सामना केला तर साहाने २७२ चेंडूचा सामना केला.
शेष भारताचा विजय कालच निश्चित झाला होता. शेष भारताचा संघ एकवेळेस चार बाद ६३ धावांवर लडखडला होता. मात्र साहा व पुजाराने संघाला अडचणीतून बाहेर काढले. गुजरातने पहिल्या डावात ३५८ तर शेष भारतने २२६ धावा केल्या होत्या. गुजरातने दुसऱ्या डावात २४६ धावा करत शेष भारतला ३७९ धावांचे लक्ष्य दिले होते. शेष भारताने १९
पैकी १५ वेळा इराणी ट्रॉफी जिंकली आहे. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक-
गुजरात पहिला डाव १०२.५ षटकांत सर्वबाद - ३५८़, दुसरा डाव ९०.३ षटकात सर्वबाद २४६ धावा.
शेष भारत पहिला डाव : ७५ षटकांत सर्व बाद २२६ धावा़,दुसरा डाव १०३ .१ षटकांत ४ बाद ३७९ धावा. (चेतेश्वर पुजारा नाबाद ११६, वृद्धिमान साहा नाबाद २०३ हार्दिक पटेल २/१०४)़

Web Title: Irani Trophy Rest of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.