इराकने दिला भारताला धक्का

By admin | Published: November 2, 2015 12:16 AM2015-11-02T00:16:43+5:302015-11-02T00:16:43+5:30

जकर्ता (इंडोनिशिया) येथे सुरु असलेल्या ४थ्या आशिया अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत भारताला इराक विरुध्द ६९-९० असे पराभूत व्हावे लागले

Iraq gives India shock | इराकने दिला भारताला धक्का

इराकने दिला भारताला धक्का

Next

बंगळुरु : जकर्ता (इंडोनिशिया) येथे सुरु असलेल्या ४थ्या आशिया अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत भारताला इराक विरुध्द ६९-९० असे पराभूत व्हावे लागले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये निराशाजनक कामगिरी राहिल्यानंतर कर्णधार पी. बालधनेश्वर, आक्रमक अंकित जोशी आणि मध्यरक्षक आदर्श जयकुमार यांनी धडाकेबाज खेळ करुन इराकवर २५-१५ असे वर्चस्व राखले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये घेतलेली आघाडी इराकने निर्णायक ठरवत
बाजी मारली. कर्णधार बालधनेश्वर आणि अंकित यांनी अनुक्रमे २६ व २४ गुणांची कमाई करुन अपयशी लढत दिली. त्याचवेळी इराककडून अब्दुल्लाहने सर्वाधिक ३९ गुण
घेताना एकहाती वर्चस्व राखले. २ नोव्हेंबरला भारत स्पर्धेतील १३व्या आणि १४व्या स्थानासाठी हाँगकाँग आणि बांगलादेश यांच्यातील विजेत्याविरुध्द खेळेल.

Web Title: Iraq gives India shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.