ईशांतचा आत्मविश्वास प्रेरणादायी
By admin | Published: July 30, 2014 01:15 AM2014-07-30T01:15:43+5:302014-07-30T01:15:43+5:30
आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात पुनरागमन करण्यावर झहीर खानचा भर आहे. आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो सध्या संघाबाहेर आहे.
Next
विनय नायडू - मुंबई
आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात पुनरागमन करण्यावर झहीर खानचा भर आहे. आयपीएलमध्ये झालेल्या दुखापतीमुळे तो सध्या संघाबाहेर आहे. मात्र, आपल्या अनुपस्थितीत इंग्लंड दौ:यात गोलंदाजीचे नेतृत्व करणा:या ईशांतने चांगलेच प्रभावित केले असून त्याचा आत्मविश्वास प्रेरणादायी असल्याचे झहीरने म्हटले. तो एका फिजिओथेरपी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होता.
भारतीय संघाचे माजी फिजिओ अॅण्ड्रय़ू लोपीस आणि माजी फिटनेस ट्रेनर अण्ड्रय़ून ल्युरोक्स हे दोघे मिळून अॅथलिट्सना तसेच मुलांना फिजिओचे धडे देणार आहेत. त्यानिमित्त लोअर परेल येथे पाच हजार स्क्वेअर फुटांच्या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी झहीर म्हणाला, मी सध्या इंग्लंड दौ:यात भारतीय संघाचा भाग नाही. याचे मला दु:ख नाही. माङया अनुपस्थितीत ईशांत शर्माने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचा आत्मविश्वास प्रेरणादायी आहे. त्याला चांगली उंची आहे आणि त्याचा त्याने फायदाही उठवला आहे. ईशांतला दुखापतीमुळे साउथम्पटन कसोटी सामन्याला मुकावे लागले. यावर झहीर म्हणाला, की दुखापती तुम्हाला सांगून येत नाहीत. तो एक खेळाचा भागच आहे. ईशांतची दुखापत गंभीर नसेल. तो त्यातून लवकर सावरेल, अशी आशा आहे.