भारताची नेमबाज अपुर्वी चंडेलाचा विश्वविक्रमासह 'सुवर्ण' वेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 03:40 PM2019-02-23T15:40:47+5:302019-02-23T15:41:11+5:30
नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अपुर्वी चंडेलाने 10 मी एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले.
नवी दिल्ली : येथे सुरू असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या अपुर्वी चंडेलाने 10 मी एअर रायफलमध्ये सुवर्णपदक जिंकले. अपुर्वीने 252.9 गुणांसहीत केला विश्वविक्रमाची नोंद केली. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना अपुर्वीने दोन फेऱ्या शिल्लक असताना 0.8 गुणांची आघाडी घेतली होती. चिनच्या झाओ रौझोने त्यानंतर 10.5 चा निशाणा साधला, परंतु अपुर्वीने त्याला 10.8च्या निशाण्याने प्रत्युत्तर देताना आघाडी 1.1 अशी वाढवली. अखेरच्या फेरीत अपुर्वीने 10.5 गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला. तिनो झाओच्या नावावर असलेला विक्रम मोडताना भारताच्या खात्यात सुवर्णपदक जमा केले.
Apurvi Chandela takes the first World Cup gold of the season in front of her home crowd! 🇮🇳 #ISSFWCpic.twitter.com/pglGwtAMyA
— ISSF (@ISSF_Shooting) February 23, 2019
अपुर्वीची सुरुवात निराशाजनक झाली होती. पहिल्या फेरीनंतर ती सातव्या स्थानावर होती, परंतु तिने सातत्याने कामगिरीत सुधारणा केली आणि चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिचा एकही निशाणा 10 गुणांच्या खाली लागलाच नाही. सहाव्या फेरीनंतर ती अव्वल स्थानावर आली. त्यानंतर तिने सलग 10.6 व 10.8 गुणांना निशाणा साधला.
India's @apurvichandela shoots World Record to win Gold in Women's 10m Air Rifle at the ISSF World Cup in New Delhi - More on https://t.co/hLqEufRD17pic.twitter.com/ZCtxadXrIf
— indianshooting (@indianshooting) February 23, 2019
अंतिम फेरीत खेळणाऱ्या आठ नेमबाजांत 26 वर्षीय अपुर्वी ही सर्वात युवा खेळाडू होती. वर्ल्ड कप स्पर्धेतील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. याआधी तिला 2015 मध्ये चँगवॉन येथे कांस्य, तर म्युनिच येथे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
चिनच्या रौशू झाओ आणि हाँग झू यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. अपूर्वी आणि अंजूम मुदगील या भारतीय खेळाडूंनी 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता आधीच निश्चित केली आहे. त्यामुळे चीनी खेळाडूंना ऑलिम्पिकचे तिकिट मिळाले.