कसोटी संघातील धोनीची उणीव भरणे कठीण : साहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2016 05:51 AM2016-07-02T05:51:34+5:302016-07-02T05:51:34+5:30
महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती होताच निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नसल्याचे मत यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने व्यक्त केले आहे.
बंगलोर : कसोटी क्रिकेटमधून महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती होताच निर्माण झालेली पोकळी भरून काढणे सोपे नसल्याचे मत यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने व्यक्त केले आहे.
धोनी दीर्घकाळापासून मॅच विनर राहिल्याने त्याचे स्थान घेणे सोपे नाही, असे साहा म्हणाला. मागच्या मालिकेत माझी कामगिरी फारशी चांगली नव्हती. यंदाच्या विंडीज दौऱ्यात मात्र मी चांगली कामगिरी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मला तळाच्या स्थानावर फलंदाजी करणे पसंत असून, यामुळे धावांची भर घालून मोक्याच्या क्षणी निर्णायक खेळी करता येते, असे रिद्धिमान याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. (वृत्तसंस्था)
>माहीच्या निवृत्तीनंतर त्याचे स्थान घेणे सोपे नव्हते. मी धोनीसारखाच संघाला योगदान देण्याचा प्रयत्न करीत आहे. फलंदाजी आणि यष्टिरक्षणात योगदान देण्याचा माझा प्रयत्न असून, मला जेव्हा गरज असते त्यावेळी धोनीचा सल्ला घेत असतो. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात माहीचा सल्ला घेतला होता. फलंदाजीवेळी दडपणाचा सामना कसा करायचा आणि यष्टिरक्षणात संधीचे सोने कसे करायचे याबाबत धोनीने मला बऱ्याच टिप्स दिल्यात.
- रिद्धिमान साहा