बाद फेरी गाठणे अशक्य नाही- बायचुंग भूतिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:20 AM2018-05-16T00:20:11+5:302018-05-16T00:20:11+5:30

‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले.

It is not impossible to reach the next round - Bichung Bhutia | बाद फेरी गाठणे अशक्य नाही- बायचुंग भूतिया

बाद फेरी गाठणे अशक्य नाही- बायचुंग भूतिया

Next

मुंबई : ‘पुढील वर्षी होणाऱ्या एएफसी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची वाटचाल खडतर असेल. पण असे असले तरी साखळी फेरीतून पुढे वाटचाल करणे अशक्य नक्कीच नसेल,’ असे मत भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फुटबॉलपटू बायचुंग भूतिया याने व्यक्त केले.
पुढील महिन्यात रशियात सुरु होत असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी अधिकृत प्रसारण वाहिनीच्या ‘मेरी दुसरी कंट्री’ या उपक्रमाचे भूतियाच्या उपस्थितीत घोषणा झाली. यावेळी भुतियाने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, ‘भारताला आशिया चषकासाठी जो ‘अ’ गट मिळाला आहे, त्यासाठी आपण स्वत:ला भाग्यशाली मानले पाहिजे. आपण जागतिक क्रमवारीत चांगले स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्याने आपल्याला असा गट मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय संघाला जाते.’ आशिया चषकासाठी भारतीय संघाचा ‘अ’ गटात समावेश असून या गटात बहारीन, थायलंड आणि यजमान संयुक्त अरब अमिराती यांचाही समावेश आहे.
तसेच, ‘आशिया चषक स्पर्धेत काहीच सहजसोपे साध्य होणार नाही. येथे प्रत्येक संघ त्वेशाने खेळेल. तरीही २०११ च्या तुलनेत यंदा भारताला मिळाला गट खूप दिलासादायक आहे. आपण नशिबवान आहोत की, गटात कोरिया, इराण, इराक आणि जपान यांच्यासारखे आशियाई महाशक्ती संघाचा समावेश नाही. खेळाडूंच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळाली, तर नक्कीच भारतीय संघ चमकदार आगेकूच करु शकेल,’ असेही भूतियाने म्हटले.

Web Title: It is not impossible to reach the next round - Bichung Bhutia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.