पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल!: पी. व्ही. सिंधू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 07:47 AM2024-08-03T07:47:25+5:302024-08-03T07:48:11+5:30
मी पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल; पण आयुष्यात पुढे जात असताना मी तो पचवून घेईन, याची मला खात्री आहे.
पॅरिस : स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिला गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. २०१६ ची रौप्य आणि २०२० ची कांस्य विजेत्या सिंधूला तिसरे ऑलिम्पिक पदक जिंकता आले नाही. चीनच्या खेळाडूने सरळ गेममध्ये तिचा पराभव केला. पराभवानंतर सिंधूने भावनिक पोस्ट लिहिली. 'हा पराभव माझ्या कारकिर्दीत सर्वांत कठीण आहे. मी पराभूत झाले हे सत्य स्वीकारायला वेळ लागेल; पण आयुष्यात पुढे जात असताना मी तो पचवून घेईन, याची मला खात्री आहे.
पॅरिस २०२४ चा प्रवास ही एक लढाई होती. मागील दोन वर्षे दुखापतीमुळे मी खेळापासून बराच काळ दूर होते. या आव्हानांना न जुमानता मी येथे उभी राहिली आणि तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करू शकले हे मी माझे भाग्य समजते. या स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि त्याहूनही महत्त्वाचे, एका पिढीला प्रेरणा देण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. या काळात तुमचा पाठिंबा, शुभेच्छा मोठ्या दिलासा देणाऱ्या ठरल्या. माझ्या भविष्याबाबत मी स्पष्ट करू इच्छिते की, पुढेही खेळत राहणार. पण, तूर्तास एक छोटा ब्रेक घेत आहे. माझे शरीर आणि मनाला ब्रेकची गरज आहे. पुढच्या प्रवासाची रूपरेषा नियोजितपणे आखून पुढे चालत राहू.'