बांगलादेशला कमी लेखणे चुकीचे ठरेल

By admin | Published: June 15, 2017 04:01 AM2017-06-15T04:01:46+5:302017-06-15T04:01:46+5:30

सराव सामन्यात भारताने ३०० धावांची मजल मारत प्रतिस्पर्धी बांगलादेश संघाचा डाव छोट्या धावसंख्येत गुंडाळला होता. हे जरी खरे असले, तरी भारताने चॅम्पियन्स

It would be wrong to undermine Bangladesh | बांगलादेशला कमी लेखणे चुकीचे ठरेल

बांगलादेशला कमी लेखणे चुकीचे ठरेल

Next

- सुनील गावसकर लिहितात...

सराव सामन्यात भारताने ३०० धावांची मजल मारत प्रतिस्पर्धी बांगलादेश संघाचा डाव छोट्या धावसंख्येत गुंडाळला होता. हे जरी खरे असले, तरी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशला कमी लेखण्याची चूक करू नये. कारण त्या लढतीत तमीम इकबाल खेळत नव्हता. या सलामीवीराने या स्पर्धेत संघाच्या वाटचालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता तमीमने इंग्लंड (शतक) आणि आॅस्ट्रेलिया (शतकासमीप) या संघांविरुद्ध चमकदार खेळी केल्या आहेत, त्यानंतर शाकीब व महमुदुल्ला आहेत. त्यांनी सुरुवातीच्या धक्क्यानंतर संघाचा डाव सावरला होता. यावरून बांगलादेश खेळाडूंचा लढवय्या बाणा दिसून येतो. बांगलादेशची गोलंदाजीची बाजूही चांगली आहे. मुस्ताफिजूरच्या गोलंदाजीवर धावा वसूल करणे सोपे नसते. विदेशात विशेषत: इंग्लंडमध्ये कसा विजय मिळवायचा, याची बांगलादेश संघाला चांगली माहिती आहे. इंग्लंडमध्ये त्यांनी दिग्गज संघांविरुद्ध चमकदार कामगिरी करीत विजय नोंदवला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार विजयानंतर भारतीय संघातील खेळाडूंचे मनोधैर्य उंचावलेले आहे, पण श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर आत्ममश्गूलही राहायला नको. अश्विनचे संघातील पुनरागमन चांगली रणनीती होती. प्रतिस्पर्धी, खेळपट्टी किंवा वातावरण यामुळे कुठला गोलंदाज ‘मॅच विनर’ ठरेल, हे समजणे कठीण असते. जर आपण आघाडीच्या फळीतील फलंदाजाला वगळण्याबाबत विचार करू शकत नाही, तर श्रेष्ठ गोलंदाजाला कसे बाहेर ठेवू शकतो?
भारताची सलामीची जोडी आक्रमक आहे. सूर गवसला म्हणजे त्यांना रोखणे प्रतिस्पर्धी गोलंदाजांपुढे आव्हान असते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत लवकर बाद झाल्यानंतर रोहित शर्माला आता मोठी खेळी करण्याची संधी आहे. फॉर्मात असलेल्या शिखर धवनकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोहलीने शानदार फलंदाजी केली होती. भारताची गोलंदाजीही चांगली झाली. कागदावर मजबूत भासत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना निर्धाव चेंडू टाकून त्यांच्यावरील दडपण वाढविले. त्यामुळे त्यांनी चुकीच्या पद्धतीने धावा पटकावण्याच्या प्रयत्नात विकेट गमावल्या. क्षेत्ररक्षणाच्या विभागात कडवी मेहनत घेण्याची गरज असते. चांगल्या क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटल्याचे समजता येईल, पण हातापायाच्या मधून चेंडू सुटणे समजण्यापलीकडे आहे. कोहलीने पाकविरुद्धच्या लढतीनंतर बोध घेत चपळ क्षेत्ररक्षकांनी ३० यार्डच्या आत ठेवण्यावर भर दिला. कारण सीमारेषेवर चेंडू गेला, तर कुठल्याही स्थितीत एक धाव होणार असल्याचे निश्चित आहे. एकूण विचार करता भारतीय संघ सर्वच पातळीवर लढण्यासाठी सज्ज आहे. क्रिकेटची रंगतच न्यारी आहे. या खेळात दडपणाखाली दिग्गज, अनुभवी आणि संयमी खेळाडूही गुडघे टेकतात.
(पीएमजी)

Web Title: It would be wrong to undermine Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.