महेंद्रसिंह धोनीला रोखणे अशक्य

By admin | Published: May 24, 2016 04:20 AM2016-05-24T04:20:32+5:302016-05-24T04:20:32+5:30

एका बाजूला काही संघ आयपीएलच्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवण्यासाठी तयारी करीत होते, तर महेंद्रसिंह धोनीने माघारी परतण्यासाठी आपली बॅग पॅकसुद्धा केली होती. आयपीएलच्या यंदाच्या

It's impossible to stop Mahendra Singh Dhoni | महेंद्रसिंह धोनीला रोखणे अशक्य

महेंद्रसिंह धोनीला रोखणे अशक्य

Next

- रवी शास्त्री लिहितो़...

एका बाजूला काही संघ आयपीएलच्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवण्यासाठी तयारी करीत होते, तर महेंद्रसिंह धोनीने माघारी परतण्यासाठी आपली बॅग पॅकसुद्धा केली होती. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात धोनीची छाप मात्र दिसत नव्हती. दुखापतीचा व्हायरस त्याच्या खेळाडूला एकापाठोपाठ लक्ष्य करीत होता. सर्वत्र अडचणीची स्थिती असताना उत्तर मात्र कुठेच सापडत नव्हते. आयपीएलच्या साखळी फेरीतील अखेरच्या टप्प्यात धोनीने मात्र आपली म्यान केलेली तलवार बाहेर काढली. त्यासाठी आम्ही त्याचा आदर करतो. आम्हाला त्याची ती पूर्वीची झलक दिसली.
एका षटकात २३ धावांची गरज असताना चाहते आशा सोडून स्टेडियममधून काढता पाय घेतात. पण, येथे असे नव्हते. चाहते स्टेडियममध्ये कायम होते. प्रत्येक चाहता अखेरपर्यंत लढत बघण्यास उत्सुक होता. असे असताना धोनीविरुद्ध अखेरच्या षटकात गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेलकडे सोपविण्यात आली. धोनी अशी शक्ती आहे, की तिला रोखणे अशक्य आहे. आमलाचे अफलातून क्षेत्ररक्षण आणि मैदानात शिरलेल्या एका श्वानामुळे क्लायमॅक्स थोडा
वेळ टळला. या षटकात दोन चेंडू निर्धाव होते, हेही लक्ष्यात घ्यायला हवे. असे असले तरी धोनीची बॅट अखेरचा अडथळा पार करण्यात यशस्वी ठरली.
धोनी भारतीय क्रिकेटचा नायक आहे. यशाच्या सर्वोच्च शिखरावरही त्याचे पाय जमिनीवरच होते. भावना व्यक्त करण्यावर त्याचा विश्वास नाही. तो आव्हानांची प्रतीक्षा करतो आणि स्वत:ला प्रेरित करतो. सर्व अडथळे पार करून हा टप्पा गाठणाऱ्या व्यक्तीसाठी हे सर्व काही सोपे असते. यश व अपयशाचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही, हे धोनीने आत्मसात केले आहे. केवळ क्रिकेटच नाही तर सर्वसाधारण व्यक्तींच्या जीवनासाठीही धोनी रोल मॉडेल आहे.
धोनीची जेवढी प्रशंसा केली जाते त्यापेक्षा अधिक प्रशंसेचा तो हकदार आहे. कुठला खेळाडू त्यापेक्षा अधिक फिट आहे, सध्याच्या काळात त्याच्यापेक्षा चांगला यष्टिरक्षक कोण आहे, यापेक्षा सर्वोत्तम फिनिशर कोण आहे, असे प्रश्न आपण स्वत:लाच विचारायला हवेत.
मी नेहमीच म्हणतो, की अशा व्यक्तीला एकटे सोडा. वास्तविक बघता गुणतालिकेत दिसतो तेवढा पुणे संघ नक्कीच कमकुवत नव्हता. काही चुरशीच्या लढतीचे निकाल, काही सामन्यांतील नाणेफेकीचा कौल पुणे संघाच्या बाजूने असते तर निकाल वेगळा असता. ही काही कारणे नाहीत, पण असे घडू शकले असते. पुणे संघाने मोहिमेची सुरुवात व शेवट विजयाने केला. भविष्यात पुणे संघासाठी मधल्या कालावधीतील लढतीचे निकालही अनुकूल ठरतील, अशी आशा आहे. (टीसीएम)

Web Title: It's impossible to stop Mahendra Singh Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.