जांबाज मुंबई, गो गेटर्स विजयी

By admin | Published: March 2, 2017 09:44 PM2017-03-02T21:44:24+5:302017-03-02T21:44:24+5:30

‘जीतो पुणे’च्या वतीने आयोजित जीतो प्रिमिअर लीग क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यांत आरएसबीएल जांबाज

Jaanbha Mumbai, Go Gates won | जांबाज मुंबई, गो गेटर्स विजयी

जांबाज मुंबई, गो गेटर्स विजयी

Next

ऑनलाइन लोकमत
पुणे. दि. 02 -  ‘जीतो पुणे’च्या वतीने आयोजित जीतो प्रिमिअर लीग क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धेत गुरूवारी झालेल्या सामन्यांत आरएसबीएल जांबाज मुंबई, गो गेटर्स, अहमदाबाद इलेव्हन, एचएनडी जैन बोर्डींग, औरंगाबाद इलेव्हन या संघांनी विजयी आगेकूच केली.
व्हिजन मैदानावर झालेल्या सामन्यात जांबाज मुंबईने बंगळुरु इलेव्हन संघावर ५४ धावांनी विजय मिळविला. मुंबईने प्रथम २० षटकांत ७ बाद १९८ धावा फटकावल्या. पार्थ शहा याने नाबाद ७३ धावा केल्या. त्याला विशाल जैनने ३९ व करण मेहता याने २८ धावा काढून चांगली साथ दिली. बंगळुरु इलेव्हनला १९.५ षटकांतच १४४ धावांवर बाद करीत मुंबईने सहज सामना जिंकला. भावेश जैनने २७ धावा आणि लुवनीत सिसोदियाने २४ धावा केल्या. विजयी संघातर्फे कुणाल भावसार आणि राजकुमार जैन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
नेहरु स्टेडीयम मैदानावर झालेल्या सामन्यात गो गेटर्स संघाने कोल्हापूर स्टार इलेव्हनवर ६ गडी राखून मात केली. कोल्हापूरने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ११५ धावा केल्या. सतीश पाटील याने ३८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गो गेटर्स संघाने १४.४ षटकांत ४ बाद ११६ धावा करीत सामना जिंकला. मेहुल राठोड (३७), विशाल दोषी (३१) विजयाचे शिल्पकार ठरले.
पीवायसी मैदानावर झालेल्या सामन्यात अहमदाबाद इलेव्हनने नाशिक स्टार्सचा ४ गडी राखून पराभव केला. प्रथम नाशिक स्टार्सने २० षटकांत ३ बाद १९५ अशी दमदार धावसंख्या उभारली. अक्षय मुनोतने ७२, तर मयुर शहाने ६० धावांचे योगदान दिले. पत्युत्तरात, शशांक बागरेचा याच्या २५ चेंडूंतील वादळी ५० धावांच्या जोरावर १९.५ षटकांत ४ बाद १९९ धावा फटकावत अहमदाबाद इलेव्हनने थरारक विजयाची नोंद केली.
व्हिजन मैदानावर झालेल्या या सामन्यात एचएनडी जैन बोर्डींग संघाने जळगाव येथील आदिनाथ वॉरियर्स जळगाव संघाचा ७ गडी राखून धुव्वा उडविला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आदिनाथ वॉरियर्स संघाला जैन बोर्डिंच्या गोलंदाजांनी १०.४ षटकांतच केवळ ४३ धावांवर गुंडाळले. स्पर्धेतील आतापर्यंतची ही निचांकी धावसंख्या ठरली. जैन बोर्डींगच्या सिद्धार्थ जैनने अफलातून गोलंदाजी करीत अवघ्या १२ धावांत ४ बळी घेतले. नीलय व्होरा आणि अंकित कांकरिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत त्याला चांगली साथ दिली. ६.३ षटकांत ३ बाद ४५ धावा करीत जैन बोर्डिंग संघाने सामना जिंकला. या संघाचे तिन्ही फलंदाज विपुल पारेखने बाद केले.
पीवायसी मैदानावर झालेल्या सामन्यात औरंगाबाद इलेव्हनने पीसीएमसी ब्लास्टर्सवर ४३ धावांनी सरशी साधली. औरंगाबाद इलेव्हनने प्रथम २० षटकांत ७ बाद १८१ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सुशील मुगदियाने कर्णधार पदाला साजेशी खेळी करीत ३२ चेंडूमध्ये नाबाद ६४ धावांचा पाऊस पाडला. अनुज चोपडाने ४५ धावा करीत त्याला योग्य साथ दिली. प्रत्युत्तरात, पीसीएमसी ब्लास्टर्सचा संघ १९.३ षटकांत १३८ धावांवर बाद झाला. सागर जैन (३७), सचिन राठोड (२५) यांचा अपवाद वगळता पीसीएमसीच्या इतर फलंदाजांनी औरंगाबादच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. विजयी संघातर्फे अभय समदरियाने ३, राज चोपडा आणि जीतू गंगवाल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक :
जांबाज मुंबई : २० षटकांत ७ बाद १९८ (पार्थ शहा नाबाद ७३, विशाल जैन ३९, करण मेहता २८, प्रमोद पोरवाल २/३०) विवि बंगळुरु इलेव्हन : १९.५ षटकांत सर्वबाद १४४ (भावेश जैन २७, लुवनीत सिसोदीया २४, कुणाल भावसर ३/२६, राजकुमार जैन ३/२७, सचिन सेठ २/२१)
कोल्हापूर स्टार इलेव्हन : २० षटकांत ८ बाद ११५ (सतीश पाटील ३८, रोहीत पाटील २३, आकाश शहा ३/१६, नितेश ओसवाल १/२०) पराभूत वि. गो गेटर्स : १४.४ षटकांत ४ बाद ११६ (मेहुल राठोड ३७, विशाल दोषी ३१, आकाश शहा २१, संतोष उपाध्ये १/२०).
नाशिक स्टार्स : २० षटकांत ३ बाद १९५ (अक्षय मुनोत ७२, मयुर शहा ६०, सागर मुथा ३८, हिमांशु शहा २/४५, प्रशांत बुराड १/२०) पराभूत वि. अहमदाबाद इलेव्हन : १९.५ षटकांत ६ बाद १९९ (शशांक बागरेचा ५०, अक्षय शहा ३/२८, रोहित सुराणा २/२८, मयुर शहा १/३४).
आदिनाथ वॉरियर्स, जळगाव : १०.४ षटकांत सर्वबाद ४३ (सिद्धार्थ जैन ४/१२, नीलय व्होरा २/५, अंकित कांकरिया २/१५) पराभूत वि. एचएनडी जैन बोर्डींग : ६.३ षटकांत ३ बाद ४५ (अक्षय कोचर १९, विपुल पारेख ३/१)
औरंगाबाद इलेव्हन : २० षटकांत ७ बाद १८१ (सुशील मुगदिया नाबाद ६४, अनुज चोपडा ४५, विशाल सोनिग्रा १-२६, सागर जैन १-२६, सुमीत भंडारी १-२८) विवि पीसीएमसी ब्लास्टर्स : १९.३ षटकांत सर्वबाद १३८ (सागर जैन ३७, सचिन राठोड २५, अभय समदरिया ३/१२, राज चोपडा २/९, जीतु गंगवाल २/२७).

Web Title: Jaanbha Mumbai, Go Gates won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.