विरोधी कॅप्टनसाठी जडेजा ठरतो कर्दनकाळ

By Admin | Published: March 6, 2017 05:56 PM2017-03-06T17:56:01+5:302017-03-06T17:56:01+5:30

सामन्याच्या दुस-या दिवशी भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची विकेट घेतली आणि...

Jadeja leads to Captain Cricketer | विरोधी कॅप्टनसाठी जडेजा ठरतो कर्दनकाळ

विरोधी कॅप्टनसाठी जडेजा ठरतो कर्दनकाळ

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरूत सुरू असलेल्या दुस-या कसोटी समान्याच्या तिस-या दिवशीचा खेळ संपेपर्यंत भारताने कांगारूंवर 126 धावांची आघाडी घेतली आहे. 213 धावांवर भारताच्या 4 विकेट गेल्या असून अजून 6 फलंदाज बाकी आहेत.
 
दरम्यान सामन्याच्या दुस-या दिवशी भारताचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथची विकेट घेतली.  स्मिथला 8 धावांवर बाद करत जडेजाने एक विक्रम केला. कोणत्याही कसोटी संघाच्या कर्णधारासाठी रविंद्र जडेजा सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचं आकडे सांगतात. 
 
जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत स्टिव्ह स्मिथला दुस-यांदा आउट केलं तेही लागोपाठच्या दोन डावांमध्ये . यापुर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुकला सर्वाधिक 6 वेळेस जडेजाने आउट केलं आहे.  
 जडेजा vs कर्णधार-
1.इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुक- 6 वेळेस आउट
2. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार  मायकल क्लार्क- 5 वेळेस
3. द. अफ्रीकेचा कर्णधार हाशिम अमला- 3 वेळेस
4. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ- 2 वेळेस
 

Web Title: Jadeja leads to Captain Cricketer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.