जडेजाचा 'षटकार', कांगारूंकडे 87 धावांची आघाडी

By admin | Published: March 6, 2017 11:39 AM2017-03-06T11:39:13+5:302017-03-06T11:39:13+5:30

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरूत सुरू असलेल्या दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांमध्ये रोखण्यात यश

Jadeja's 'Six Toss', 87 runs against Kangaroo | जडेजाचा 'षटकार', कांगारूंकडे 87 धावांची आघाडी

जडेजाचा 'षटकार', कांगारूंकडे 87 धावांची आघाडी

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान बंगळुरूत सुरू असलेल्या दुस-या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताला ऑस्ट्रेलियाचा डाव 276 धावांमध्ये रोखण्यात यश आलं.  फिरकीपटू रविद्र जडेजाच्या भेदक मा-याच्या जोरावर भारताने कांगारूंचा डाव संपुष्टात आणला. जडेजाने  63 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने भारतावर 87 धावांची आघाडी घेतली आहे. प्रत्युत्तरात भारताची सुरूवात चांगली झाली आहे. सध्या मैदानावर सलामीवीर लोकश राहुल(20) आणि अभिनव मुकुंद(16) खेळत असून भारताच्या बिनबाद 38 धावा झाल्या आहेत.
 
कालच्या  6 बाद 237 धावांहून पुढे खेळताना कांगारूंनी सुरूवातीला सावध पवित्रा घेतला. काल नाबाद असलेले स्टार्क आणि वेड यांनी आघाडी 50 धावांच्या पुढे नेली. संघाच्या 269 धावा असताना अश्विनने स्टार्कला (26) बाद करत ही जोडी फोडली आणि पुढच्या अवघ्या 8 धावांमध्ये कांगारूंचा डाव जडेजाने संपुष्टात आणला.  
 
त्यापुर्वी काल सलामीवीर मॅट रेनशॉ व शॉन मार्श यांची झुंजार अर्धशतकी खेळी, भारताचे सुमार क्षेत्ररक्षण आणि डीआरएसच्या चुकीचा लाभ घेत ऑस्ट्रेलियाने रविवारी पहिल्या डावात आघाडी घेतली आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर वर्चस्व कायम राखले होते. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर 6 बाद 237 धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 48 धावांची आघाडी घेतली होती. पुणे कसोटीत 333 धावांनी पराभव स्वीकारणारा भारतीय संघाचा पहिला डाव 189 धावांत संपुष्टात आला आहे. 
 

Web Title: Jadeja's 'Six Toss', 87 runs against Kangaroo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.