जय बिस्टाचे दमदार शतक

By admin | Published: March 7, 2016 03:15 AM2016-03-07T03:15:39+5:302016-03-07T03:15:39+5:30

युवा सलामीवीर जय बिस्टा याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक आणि आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर रणजी चॅम्पियन मुंबईने शेष भारताविरुद्ध इराणी करंडक

Jai Bist scored a magnificent century | जय बिस्टाचे दमदार शतक

जय बिस्टाचे दमदार शतक

Next

मुंबई : युवा सलामीवीर जय बिस्टा याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक आणि आघाडीच्या फळीतील अन्य फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या बळावर रणजी चॅम्पियन मुंबईने शेष भारताविरुद्ध इराणी करंडक क्रिकेट सामन्यातील पहिला दिवस गाजवला. दिवसअखेर त्यांनी ३ बाद ३८६, अशी धावसंख्या रचत धावांचा डोंगर उभारण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर त्यांच्या मजबूत फलंदाजीसमोर शेष भारताचे गोलंदाज बळी मिळविण्यासाठी तरसत असल्याचे दिसून आले. मुंबईच्या फलंदाजांनी गोलंदाजांचा समाचार घेताना त्यांना वर्चस्व मिळवू दिले नाही. तसेच, पहिल्याच दिवशी मुंबईच्या फलंदाजांनी २४८ धावा या फक्त चौकार आणि षटकारांनी ठोकल्या.
सी.के. नायडू अंडर २३ स्पर्धेच्या फायनलमध्ये द्विशतक ठोकून मुंबईच्या सिनिअर संघात पुनरागमन करणारा बिस्टाने ९० चेंडूंत १५ चौकार आणि एका षटकारासह १०४ धावा केल्या आणि पहिल्या गड्यासाठी अखिल हेरवाडकर (९०) याच्या साथीने १९३ धावांची भागीदारी करताना संघाला शानदार सुरुवात करून दिली. हेरवाडकरने १४८ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार मारले. हे दोघे १६ धावांच्या अंतरात बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर (५५) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ८८) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६३ धावांची भागीदारी करताना मुंबईची स्थिती आणखी मजबूत केली. स्टुअर्ट बिन्नीने अय्यरला बाद करीत ही भागीदारी मोडली. श्रेयस अय्यरने ४९ चेंडूंत १० चौकार मारले. त्यानंतर सूर्यकुमार यादवला आदित्य तारेच्या रूपाने चांगला साथीदार मिळाला. तारे ३८ धावांवर खेळत आहे. या दोघांनी आतापर्यंत चौथ्या गड्यासाठी नाबाद ११४ धावांची भागीदारी केली आहे. सूर्यकुमार यादवने १२५ चेंडूंचा सामना करताना १५ चौकार व एक षटकार मारला, तर आदित्य तारे याने ८६ चेंडूंत ४ चौकार मारले. शेष भारताकडून बिन्नी, अंकित राजपूत आणि कृष्णा दास यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Web Title: Jai Bist scored a magnificent century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.