जय-पराजयाचे अंतर कमी असेल!
By admin | Published: May 27, 2016 03:57 AM2016-05-27T03:57:51+5:302016-05-27T03:57:51+5:30
विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मी हैदराबाद आणि गुजरात यापैकी एका संघाला निवडणार नाही. दोन्ही संघ दमदार असल्याने लहान धावसंख्येचा बचाव करण्याचे तंत्र दोन्ही संघांना अवगत
- रवी शास्त्री लिहितो़...
विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून मी हैदराबाद आणि गुजरात यापैकी एका संघाला निवडणार नाही. दोन्ही संघ दमदार असल्याने लहान धावसंख्येचा बचाव करण्याचे तंत्र दोन्ही संघांना अवगत आहे. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मॅक्युलम अथवा वॉर्नर नव्हे, तर अन्य खेळाडू देखील स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटविण्यास सज्ज आहेत.
सामन्याचा धावफलक दुसऱ्या दिवशी सर्वकाही सांगत नाही. विपुल शर्मा किंवा एकलव्य द्विवेदी यांच्या दोन षटकारांचे महत्त्व देखील विषद होत नाही. झेल पकडण्यासाठी भुवनेश्वरने मारलेला सूर किती महत्त्वपूर्ण होता हे धावफलक पाहून सांगता येत नाही. ड्वेन स्मिथ किती धोकादायक आहे हे देखील धावफलकावरून कळणे शक्य नाही. खरेतर सामन्याचे चित्र पालटू शकणारे खेळाडू दोन्ही संघात आहेत.
चांगल्या खेळाडूंचे गुणकौशल्य, टेंम्परामेंट आणि फिटनेस यातून कळत नाहीत. चांगले खेळाडू तेच जे परिस्थितीचे भान राखून कामगिरी करतात. खेळात कुठल्याक्षणी काय करावे, मोक्याच्या क्षणी संधीचा लाभ कसा घ्यावा आणि कुठल्यावेळी कुठले पाऊल उचलावे याची जाण ज्यांना असते तेच चांगले खेळाडू. आजच्या सामन्यात उभय संघ पॉवर प्लेमध्ये फिरकी गोलंदाजांचा वापर करतील अशी आशा आहे. वॉर्नर क्रिजवर असताना कसा खेळेल हे पाहण्याची उत्सुकता रवींद्र जडेजा याला असेलच. ब्रँडन मॅक्युलम आणि फिंच यांना विपुल शर्माकडून कसे आव्हान मिळेल, हे पाहायचेय.
हैदराबाद संघ अद्याप तिसऱ्या क्रमांकाचा तिढा सोडवू शकला नाही. या क्रमासाठी वारंवार प्रयोग करण्यात आला पण कुणीही खेळाडू फिट बसलेला दिसत नाही. युवराज नव्या भूमिकेला न्याय देत आहे. संघाची सुरुवात चांगली झाल्यास युवराजला मोकळेपणाने खेळण्यास वाव असतो. युवीच्या फटक्यात ताकद आणि टायमिंग यांचे मिश्रण आहे. क्षेत्ररक्षणातही त्याचा दम दिसला. त्याने एका फलंदाजाला धावबाद करीत हे दाखवून दिले. आजच्या सामन्याचा निकाल काहीही असो; पण एक निश्चित की जय- पराजयाचे अंतर अगदीच कमी असेल. (टीसीएम)