‘जय’वर्धनेचे शानदार शतक
By admin | Published: July 25, 2014 02:32 AM2014-07-25T02:32:33+5:302014-07-25T02:32:33+5:30
चौथ्या गडय़ासाठी केलेल्या 131 धावांच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंकेने दुस:या कसोटीत पहिल्या दिवसअखेर 5 बाद 3क्5 असा मजबूत स्कोअर उभा केला आह़े
Next
दुसरी कसोटी : श्रीलंका 5 बाद 305
कोलंबो : माजी कर्णधार महेला जयवर्धनेचे (नाबाद 14क्) शानदार शतक आणि त्याने कर्णधार एंजेलो मॅथ्यूज (63) सोबत चौथ्या गडय़ासाठी केलेल्या 131 धावांच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंकेने दुस:या कसोटीत पहिल्या दिवसअखेर 5 बाद 3क्5 असा मजबूत स्कोअर उभा केला आह़े
जयवर्धने याने कारकीर्दीतले 34वे कसोटी शतक पूर्ण केल़े त्याने 225 चेंडूंचा सामना करताना 16 चौकार आणि एक षटकार लगावला़ त्याच्या बरोबर मॅथ्यूज यानेही आपला फॉर्म कायम राखताना 135 चेंडूंना सामोरे जाताना 63 धावांची खेळी केली़ लंकेचा सलामीवीर फलंदाज कौशल सिल्वा याने 73 चेंडूंत 7 चौकारांसह 44 धावांची खेळी केली़ मात्र, कुमार संगकारा याला (क्) भोपळाही फोडता आला नाही़ पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जयवर्धने 14क् आणि निरोशन डिकवेला 12 धावांवर खेळत होता़
त्याआधी श्रीलंकेने आपले दोन गडी 16 धावांतच गमावले होत़े मात्र, जयवर्धने आणि सिल्वा यांनी तिस:या गडय़ासाठी 99 आणि मॅथ्यूजसोबत चौथ्या गडय़ासाठी 131 धावांची भागीदारी रचत डाव सावरला़ पहिल्या कसोटी पराभवाचा सामना कराव्या लागणा:या लंकेची मोठय़ा स्कोअरकडे आगेकूच झाली आह़े
- श्रीलंका : 86 षटकांत 5 बाद 3क्5़ (उपुल थरंगा 11, कौशल सिल्वा 44, कुमार संगकारा क्, महेला जयवर्धने नाबाद 14क्, एंजेलो मॅथ्यूज 63, क़े विटांगे 13, निरोशन डिकवेला नाबाद 12़ डेल स्टेन 2/55, मोर्केल 1/42)़