भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीतून जेम्स अॅंडरसन बाहेर

By admin | Published: October 19, 2016 08:21 PM2016-10-19T20:21:31+5:302016-10-19T20:21:31+5:30

पुढील महिन्यात भारत दौ-यावर येणा-या इंग्लंड क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. इंग्लंडचा हुकमी वेगवान गोलंदाज जेम्स अॅंडरसन

James Anderson out of the first Test against India | भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीतून जेम्स अॅंडरसन बाहेर

भारताविरूद्धच्या पहिल्या कसोटीतून जेम्स अॅंडरसन बाहेर

Next

ऑनलाइन लोकमत

चितगाव, दि. 19 - पुढील महिन्यात भारत दौ-यावर येणा-या इंग्लंड क्रिकेट संघाला धक्का बसला आहे. इंग्लंडचा हुकमी  वेगवान  गोलंदाज जेम्स अॅंडरसन  भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. अँडरसनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. सध्या इंग्लंडचा संघ बांगलादेश दौ-यावर असून जखमी असल्यामुळे या मालिकेतुनही अँडरसन बाहेर पडला आहे.   

इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूकने पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली. दुखापतीततून अजून पुर्णपणे सावरू शकला नसल्याने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अँडरसन खेळू शकणार नाही. संघातील त्याच्या समावेशाबाबत निर्णय पुढील आठवड्यानंतरच घेतला जाईल असं कूक म्हणाला.
 
बांगलादेशविरुद्धची इंग्लंडची कसोटी उद्यापासून (गुरुवार) सुरू होणार आहे. 34 वर्षिय अॅंडरसन हा इंग्लडच्या वेगवान गोलंदाजीचा कणा मानला जातो. 9 नोव्हेबरपासून इंग्लंड आणि भारतामध्ये कसोटी मालिकेला सुरूवात होईल. या दौ-यात पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि  तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहे.

Web Title: James Anderson out of the first Test against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.