जपान ओपन सुपर सिरीज : कश्यप मुख्य फेरीत
By admin | Published: September 20, 2016 05:35 PM2016-09-20T17:35:28+5:302016-09-20T17:35:28+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.
ऑनलाइन लोकमत
टोकियो, दि. २० : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता भारताच्या पी. कश्यपने पुरुष एकेरीत पात्रता फेरीतील दोन्ही लढती जिंकून जपान सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. त्याचा पुढील फेरीतील सामना आपल्याच देशाच्या के. श्रीकांतविरुद्धहोणार आहे.
पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात कश्यपला आॅस्ट्रियाच्या के. डेव्हिड ओबेरनोसटेररविरुद्ध खेळताना जास्त मेहनत नाही घ्यावी लागली. ११-३ गुणांनी कश्यप आघाडीवर असताना डेव्हिडने माघार घेतली. दुसऱ्या लढतीत चौथ्या मानांकित कश्यपने डेन्मार्कच्या अॅँडर्स एंटोनसेनला २१-१८, २१-१२ गुणंनी पराभूत करून मुख्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.
महिलांच्या गटात भारताच्या तन्वी लाडला चुरशीच्या झालेल्या लढतीत जापानच्या चिसोतो होशीकडून २१-१९, ८१-२१, ९-२१ गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांत व कश्यपच्या व्यतिरिक्त भारताचे एच.एस. प्रणय, अजय जयराम, बी. साई प्रणीत हे बुधवारी मुख्य फेरीत आपल्या अभियानाची सुरुवात करतील.