विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला...

By admin | Published: March 26, 2016 02:15 AM2016-03-26T02:15:39+5:302016-03-26T02:15:39+5:30

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे.

Jaspreet Bumrahalla is credited with winning ... | विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला...

विजयाचे श्रेय जसप्रीत बुमराहला...

Next

- वासिम आक्रम लिहितो़...

बांगलादेशने पुन्हा एकदा तोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावण्याची संधी दिली; पण भारतीय संघ फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर का खेळत आहे, हे न उलगडणारे कोडं आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांनाही बरोबरीची संधी मिळते. बांगलादेशविरुद्ध भारताने पाटा खेळपट्टीवर खेळायला पाहिजे होते. भारतीय संघाला फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सल्ला कोण देत आहे? बांगलादेशविरुद्धचा भारताचा विजय हा चमत्कार होता. बांगलादेशने अनेक चुका केल्या. अखेरच्या षटकात तीन चेंडंूवर ९ धावा वसूल केल्यानंतर महमुदुल्ला व मुशफिकर यांच्यासारख्या अनुभवी फलंदाजांना अशा प्रकारचे फटके खेळण्याची गरजच नव्हती. दडपणाखाली हा संघ ढेपाळला.
टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळपट्टीवर १४५ धावांच्या लक्ष्याचा बचाव करणे कठीण असल्याची भारताला चांगली कल्पना होती; पण अखेर यजमान संघ नशिबवान ठरला. पंड्याने अखेरचा चेंडू ‘लेंथ बॉल’ केला; पण बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजाने स्टम्प कव्हर न केल्यामुळे त्याला विजयासाठी आवश्यक धावा फटकावता आल्या नाहीत. ही बाब कुणी प्रशिक्षक सांगू शकत नाही. तळाच्या फलंदाजांना मर्यादा ओलांडून विचार करण्याची गरज आहे. धोनी नेहमी आकलनापलीकडचा विचार करतो. पंड्या लेंथ चेंडूने फलंदाजाला बिट करण्यात यशस्वी ठरल्यामुळे यजमान संघ नशिबवान ठरला. शिवाय धोनीने सुरुवातीला ग्लोव्हज् काढून घेत हुशारीची प्रचिती दिली. भारताने बांगलादेशविरुद्ध विजय मिळविला असला तरी यजमान संघाला अद्याप या स्पर्धेत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बुमराहने १९ व्या षटकांत चांगला मारा केला. भारताने त्याला १९ वे षटक टाकण्याची संधी दिली, हे चांगले झाले. जर पंड्याने १९ व्या षटकांत गोलंदाजी केली असती, तर सामना त्याच षटकांत संपला असता. बुमराहने दडपण झुगारत चांगले यॉर्कर टाकले. दुसऱ्या बाजूचा विचार करता पाकिस्तान संघ सध्या दडपणाखाली आहे. न्यूझीलंडविरुद्ध या संघाने विजयाची संधी गमावली. अहमद शहजाद व उमर अकमल यांना फुलटॉस चेंडूंवर बाउंड्री लगावता आली नाही. (टीसीएम)

Web Title: Jaspreet Bumrahalla is credited with winning ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.