'Javelin ek prem katha': नीरज चोप्राची Ad क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री; पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 11:37 AM2021-09-20T11:37:00+5:302021-09-20T11:39:36+5:30
Tokyo Olympic मध्ये नीरज चोप्रानं भालाफेक स्पर्धेत मिळवलं होतं सुवर्ण पदक. नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्यानं आता जाहिरात क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकीत भारतालासुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा स्टार बनला आहे. अनेकांनी त्याच्या मेहनतीचं कौतुकही केलं होतं. ऑलिम्पिक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये पहिल्यांदा भारतालासुवर्ण पदक मिळालं होतं. परंतु आता नीरज चोप्रानं जाहिरात क्षेत्रातही धमाकेदार एन्ट्री केली आहे.
नीरज चोप्रानं जाहिरात क्षेत्रात धमाकेदार एन्ट्री करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिल आहे. रविवारी आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याला (IPL 2021) सुरूवात झाली. IPL च्या सामन्यापूर्वी नीरज चोप्राची नवी जाहिरातही प्रदर्शित करण्यात आली. नीरज चोप्रा आता क्रेडिट कार्ड पेमेंट अॅप CRED च्या जाहिरातीत झळकला आहे.
360 Degree Marketing! @cred_club#adpic.twitter.com/RmjWAXERxm
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) September 19, 2021
नीरज चोप्रानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याचा एक व्हिडीओही जारी केला आहे. या जाहिरातीत नीरज चोप्राला निरनिराळ्या रुपात दाखवण्यात आलं आहे. सोन्याचे दर वाढले आहेत, मी तुला स्टार बनवेन असं तो यात म्हणताना दिसत आहे. यापूर्वी CRED नं भारतीय संघाचा माजी फलंदाज राहुल द्रविडसोबतही जाहिरात केली होती. यामध्ये राहुल द्रविडलाही राग येत असल्याचं दाखवलं होतं. यापूर्वी नीरज चोप्रा भारतीय हॉकी टीमचा गोलकिपर पीआर श्रीजेशसह कौन बनेगा करोडपतीमध्येही झळकला होता. यामध्ये त्यानं बिग बी अमिताभ बच्चन (BigB Amitabh Bachchan) यांना हरयाणवी भाषा शिकवताना दिसला होता.