जवाहरलाल दर्डा फुटबॉल

By admin | Published: December 22, 2014 11:11 PM2014-12-22T23:11:57+5:302014-12-22T23:11:57+5:30

जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत

Jawaharlal Darda Football | जवाहरलाल दर्डा फुटबॉल

जवाहरलाल दर्डा फुटबॉल

Next
ाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत
सेंट जॉन हायस्कूल चॅम्पियन
नागपूर : रूपेश आत्राम याने नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर सेंट जॉन हायस्कूल संघाने कामठीच्या एम.एम. रब्बानी हायस्कूलचा २-० ने पराभव करीत सोमवारी जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीने मध्य रेल्वेच्या अजनी मैदानावर आयोजित ही स्पर्धा लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडने पुरस्कृत केली होती.
सेंट जॉनच्या खेळाडूंनी सामन्यावर सुरुवातीपासून पकड निर्माण करीत रब्बानीसारख्या बलाढ्य संघाची पाटी अखेरपर्यंत कोरी ठेवली. या दरम्यान दहाव्या मिनिटाला रूपेशने संघाला पहिला गोल नोंदवून दिला. उत्तरार्धात बरीच चढाओढ गाजली. बरोबरी साधण्यासाठी रब्बानीचे खेळाडू वारंवार हल्ले करीत राहिले पण त्यांना यश आले नाही. दुसरीकडे रूपेशने अखेरच्या मिनिटाला पुन्हा एकदा धडक देत दुसरा गोल नोंदविला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
सामन्यात खराब खेळ केल्याबद्दल विजेत्या संघातील आबिद शेख आणि रूपेश आत्राम यांना रेफ्रीने येलो कार्ड दाखविले. पराभूत रब्बानी संघाचा मोहम्मद साद याला ३४ आणि ५५ व्या मिनिटाला दोनदा कार्ड दाखविण्यात आल्याने त्याला मैदान सोडावे लागले. त्याचा सहकारी मुसद्दीक ओमेर याला ७७ व्या मिनिटाला येलो कार्ड दाखविण्यात आले. विजेत्या सेंट जॉनला १५ हजार आणि उपविजेत्या रब्बानी स्कूलला सात हजाराचा रोख पुरस्कार देण्यात आला. सेंट जॉनचा इद्रिस रामपूरवाला याला बेस्ट गोलकिपर म्हणून पाच हजाराचा रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उपविजेत्या संघातील मुस्तफिस रझा हा सवार्ेत्कृष्ट खेळाडू ठरला. त्याला १५०० चा रोख पुरस्कार, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, रब्बानीचा मुदस्सिक उमर याला ६ हजार रोख, मॅन ऑफ द मॅच सेंट जॉनचा आबिद शेख याला चार हजाराचा पुरस्कार तसेच उभय संघांच्या प्रशिक्षकांना प्रत्येकी १५०० रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. उपांत्य सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू अंजूमनचा मुजैफ दानिश आणि एसएफएसचा समीर गंगापूरे यांना प्रत्येकी १५०० रुपयांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.(क्रीडा प्रतिनिधी)
.....................................................


Web Title: Jawaharlal Darda Football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.