ज्वालाची ‘साई’ संचालन संस्थेच्या सदस्यपदी नियुक्ती
By admin | Published: March 17, 2017 12:29 AM2017-03-17T00:29:37+5:302017-03-17T00:29:37+5:30
भारताची दुहेरीतील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवी दिल्ली : भारताची दुहेरीतील बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
१४ वेळेस राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेली ज्वाला गुट्टा म्हणाली, ‘मी ‘साई’ संचालन संस्थेची सदस्य म्हणून नियुक्त झाल्याने खूप आनंदीत झाली आहे. मला दोनदिवस आधीच दूरध्वनी आला होता. तेव्हा मला याविषयी सूचित करण्यात आले. मी नेहमीच खेळासाठी काही करू इच्छित होते. खेळाच्या चांगल्या व विकासासाठी मी नेहमीच तयार आहे.’
‘साई’ केंद्राचे सचिव एस. एस. छाबडा यांनी ज्वालाला लिहिलेल्या पत्रात म्हटले, ‘आपल्याला माहीत करण्यास आनंद होत आहे की, आपल्याला साई संचालन संस्थेचे सदस्य म्हणून नियुक्त केले जात आहे. संचालन संस्थेच्या बैठकीसाठी आपण वेळ काढू शकाल याचा मला पूर्ण विश्वास आहे.’ दोन वेळेस आॅलिम्पियन ज्वालाने २0११ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. ती म्हणाली, ‘पहिली बैठक नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये २८ मार्चला होईल आणि त्यात सहभागी होण्यास मी तयार आहे. मला माझ्या जबाबदारीविषयी जास्त माहिती नाही; परंतु मी सर्वोत्तम कार्य करील.’