जयराम, प्रणय दुसऱ्या फेरीत

By admin | Published: October 20, 2016 04:21 AM2016-10-20T04:21:22+5:302016-10-20T04:21:22+5:30

एच. एस. प्रणय यांनी विजयी सुरुवात करताना बुधवारी येथे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला

Jayaram, Prannoy in second round | जयराम, प्रणय दुसऱ्या फेरीत

जयराम, प्रणय दुसऱ्या फेरीत

Next


ओडेंसे : भारतीय शटलर अजय जयराम आणि एच. एस. प्रणय यांनी विजयी सुरुवात करताना बुधवारी येथे डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला; परंतु बी. साईप्रणीत याचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.
डच ओपनचा उपविजेत्या जयरामने अपेक्षेनेरूप कामगिरी करताना थायलंडच्या बुनसाक पोनसानाचा ३६ मिनिटांत २१-१५, २१-१६ असा सलग गेममध्ये पराभव केला. जयरामसमोर दुसऱ्या फेरीत क्वॉलिफायर चीनचा शी युकी
आणि डेन्मार्कचा तृतीय मानांकित जान ओ जोर्गेनसन यांच्यातील
विजयी खेळाडूचे आव्हान
असेल.
प्रणयने मलेशियाच्या वेई फेंग चोंग याला १ तास ३ मिनिटे रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत २१-१३, १९-२१, २२-२० असे पराभूत केले. प्रणीतला थायलंडच्या तानोंगसाक सेनसोमबूनसुकविरुद्ध १ तास २ मिनिटांच्या लढतीत १७-२१, २१-१९, १५-२१ असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर प्रणीतचा थायलंडच्या खेळाडूविरुद्ध कारकिर्दीत ०-२ असा रेकॉर्ड
झाला आहे. प्रणीत या वर्षी इंडोनेशिया मास्टर्समध्येदेखील १८व्या मानांकित खेळाडूकडून पराभूत झाला होता.
मिश्र दुहेरीत प्रणव जैरी चोपडा आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीलादेखील पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यांना पाचव्या मानांकित डेन्मार्कच्या जाओकिम फिशर निल्सन आणि क्रिस्टिना पेडरसन या जोडीकडून ३६ मिनिटांत १५-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.
पुरुष दुहेरीत मनू अत्री व बी. सुमीत रेड्डी यांना डेन्मार्कच्या किम एस्ट्रप आणि एंडस सॅमसुसैन यांनी ३२ मिनिटांत २१-१०, २१-१९ असे पराभूत केले.

Web Title: Jayaram, Prannoy in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.