जयश्री, मोहसीनचा विक्रम

By admin | Published: January 8, 2017 03:54 AM2017-01-08T03:54:30+5:302017-01-08T03:54:30+5:30

शनिवारपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १५00 मीटरमध्ये कोल्हापूरच्या जयश्री बोरगे आणि हातोडाफेकमध्ये प्रशिक्षण संचनालायाच्या

Jayashree, Mohsin's record | जयश्री, मोहसीनचा विक्रम

जयश्री, मोहसीनचा विक्रम

Next

औरंगाबाद : शनिवारपासून सुरु झालेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेत महिलांच्या १५00 मीटरमध्ये कोल्हापूरच्या जयश्री बोरगे आणि हातोडाफेकमध्ये प्रशिक्षण संचनालायाच्या मोहसीन निजामोद्दीन यांनी नवीन विक्रम रचला.
तसेच यजमान औरंगाबादच्या रेणुका देवणे, अखिल पटेल यांनीही मैदानी क्रीडा स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला.
विद्यापीठाच्या क्रीडांगणावर झालेल्या मैदानी स्पर्धेत कोल्हापूरच्या जयश्री बोरगे हिने महिलांच्या १५00 मीटर धावण्याच्या शर्यतीत शनिवारी नवीन विक्रमाची नोंद केली. तिने याआधी स्वत:चाच ४ मि. ३७.0१ सेकंद हा विक्रम मोडताना ४ मि. ३४.0४ सेकंद वेळ नोंदवताना नवीन विक्रम रचला. त्याचप्रमाणे प्रशिक्षण संचालनालयाच्या मोहसीन निजामोद्दीन यानेदेखील ४६.३९ मीटर्स हातोडाफेक करीत नवीन विक्रम रचला. याआधीचा विक्रम हा गत वर्षी कोकण रेंजच्या प्रशांत चव्हाण याने ४५.६५ मीटर्स हातोडाफेक करीत केला होता.

कबड्डीत यजमानांची विजयी घोडदौड
कबड्डीत यजमान औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्राच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजयी प्रारंभ केला. वाल्मिक निकम, सचिन शिंदे, कृष्णा गायके यांच्या जोरदार चढाया आणि सूर्यकांत सातपुते, धनंजय व्यवहारे, संतोष शाहीर, हरी खुपसे यांच्या जोरदार पकडी या जोरावर पुरुष गटात औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्राने अमरावती संघावर ३0 विरुद्ध १७ असा ३0 गुणांनी दणदणीत विजयाची नोंद केली. विशेष म्हणजे कृष्णा गायकेने सुपर रेडमध्ये एकाच वेळी अमरावतीचे ४ खेळाडू टिपले. अन्य लढतीत पुणे शहरने रेल्वे रेंजवर ४४ वि. २0 असा २४ गुणांनी पराभव केला.

निकाल
- (महिला - १५00 मी. धावणे) : १. जयश्री बोरगे (कोल्हापूर परिक्षेत्र), २. संगीता नाईक (मुंबई शहर), ३. मिनाक्षी पाटील (कोल्हापूर). पुरुष : १. अमोल संकपाळ (रेल्वे परिक्षेत्र), २. सिद्धेश्वर रायगोंडा (प्रशिक्षण संचनालय), ३. अतुल कडू (राज्य राखीव पोलिस बल परिक्षेत्र).
- गोळाफेक : १. रेणुका देवणे (औरंगाबाद व नांदेड परिक्षेत्र), २. माधुरी मोहरे (प्रशिक्षण संचनालय), ३. प्रियंका दाणे (पुणे शहर).

Web Title: Jayashree, Mohsin's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.