मुख्य प्रशिक्षक म्हणून जयवर्धनेचा अनुभव कमी
By admin | Published: June 27, 2017 01:25 AM2017-06-27T01:25:44+5:302017-06-27T01:25:44+5:30
ग्रॅहम फोर्ड यांनी पदाचा त्याग केल्यानंतर राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू शकेल इतका महेला जयवर्धनेकडे अद्यापही
कोलंबो : ग्रॅहम फोर्ड यांनी पदाचा त्याग केल्यानंतर राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनू शकेल इतका महेला जयवर्धनेकडे अद्यापही अनुभव नसल्याचे श्रीलंका क्रिकेटचे (एसएलसी) अध्यक्ष थिलंगा सुमतिपाल यांचे म्हणणे आहे.
सुमितपाल म्हणाले, ‘सीनिअर प्रशिक्षकाच्या रूपाने अजूनही महेलाकडे अनुभवाची कमतरता आहे. तो टी-२0 फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाच्या रूपाने चांगला होऊ शकतो.’ मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक आणि माजी राष्ट्रीय संघाचा कर्णधार जयवर्धनेचे काही सहकारी अजूनही राष्ट्रीय संघात असल्याचेही त्यांनी म्हटले.
जबरदस्त कारकीर्दीनंतर २0१४ मध्ये निवृत्ती घेणाऱ्या जयवर्धनेचा क्रिकेटमधील सर्वात जास्त तज्ज्ञ लोकांत समावेश केला जातो. जयवर्धने व त्याचा सहकारी कुमार संगकारा यांनी एकाच वेळी निवृत्ती घेतल्यानंतर त्यातून श्रीलंकेचा संघ अद्यापही सावरूशकला नाही. एका वर्षासाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलेले फोर्ड यांनी कथितपणे सुमतिपाल यांच्या व्यवस्थापनेसोबत मतभेद झाल्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला होता.
२0११ पासून जवळपास ९ अंतरिम आणि स्थायी प्रशिक्षकांनी श्रीलंकन संघासोबत काम केले आहे. एसएलसी सूत्रांनुसार, ते बांगलादेशचे विद्यमान प्रशिक्षक चंदिका हथुरासिंघे यांच्याशी संपर्क करण्याचा विचार करीत आहेत; परंतु बांगलादेशसह त्यांचा करार २0१९ ला संपणार आहे. फोर्ड यांचा उत्तराधिकारी म्हणून स्टीफन फ्लेमिंग, स्कॉट स्टायरीस व टॉम मुडी यांच्या नावाचीही चर्चा आहे. (वृत्तसंस्था)