जेरोम टेलरने केला कसोटी क्रिकेटला अलविदा
By admin | Published: July 12, 2016 05:56 PM2016-07-12T17:56:15+5:302016-07-12T17:56:15+5:30
वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली
ऑनलाइन लोकमत
बार्बाडोस, दि. 12 - वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज जेरोम टेलरने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. मात्र तो एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेट खेळत राहणार असल्याचे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने वृत्तसंस्थेला सांगितले.
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी विंडीज संघाची आणि जेरोमच्या निवृत्तीची घोषणा एकाच वेळी केली. ३२ वर्षीय जेरोमची कसोटी कारकीर्द दुखापतींनी जास्त गाजली. तो २००९ ते २०१४ दरम्यान कोणतीही कसोटी खेळू शकला नाही. २०१५-१६ मध्ये आॅस्ट्रेलिया दौऱ्यात टेलर तीन कसोटीमध्ये फक्त दोन विकेट घेऊ शकला. त्यानंतर त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटकडे जास्त लक्ष दिले.
=====
कसोटी कारकीर्द :
* २००३ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसोटीत पर्दापण
* एकूण १३ वर्षांत ४६ कसोटी सामन्यांमध्ये १३० विकेट घेतल्या आहेत.
* गोलंदाजी : सर्वोत्कृष्ट कामगिरी : २०१५ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४७ धावांत ६ विकेट.
* २००६ मध्ये भारताविरुद्ध ९५ धावांत ९ विकेट
* फलंदाजी : २००८ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १० व्या क्रमांकावर फलंदाजीस येऊन १०६ धावांची आक्रमक व दमदार खेळी.
* शेवटची कसोटी : २०१६ जानेवारीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची कसोटी.