झुलन गोस्वामी ठरली वनडेतील अव्वल गोलंदाज
By admin | Published: May 9, 2017 11:47 PM2017-05-09T23:47:38+5:302017-05-09T23:47:38+5:30
भारताची महिला गोलंदाज झुलन गोस्वामीने गोलंदाजीमध्ये नवा विश्वविक्रम रचला आहे. झुलन गोस्वामी एकदिवसीय क्रिकेटमध्ये
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - भारताची महिला गोलंदाज झुलन गोस्वामीने गोलंदाजीमध्ये नवा विश्वविक्रम रचला आहे. झुलन गोस्वामी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपणारी वेगवान गोलंदाज ठरली आहे. तिने महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा ऑस्ट्रेलियन गोलंदाज कॅथरिन फिट्सपॅट्रिक्सचा विक्रम मोडीत काढला आहे.
मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या लढतीत झुलनने तीन फलंदाजांना बाद करत या विक्रमाला गवसणी घातली. आतापर्यंत 151 एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या झुलनने 181 बळी टिपले आहेत. झुलनने केलेल्या वेगवान माऱ्याच्या जोरावर भारताने या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा डाव 119 धावांत गुंडाळला. त्यानंतर मिताली राजने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या मदतीने भारताने ही लढत सात गडी राखून जिंकली.