जितू रायची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

By admin | Published: August 18, 2016 01:34 AM2016-08-18T01:34:50+5:302016-08-18T01:34:50+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जीतू राय याची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. जीतूने गत दोन वर्षांत पिस्टल

Jitu Rai recommended for Khel Ratna Award | जितू रायची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

जितू रायची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

Next

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या जीतू राय याची प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. जीतूने गत दोन वर्षांत पिस्टल नेमबाजीत शानदार कामगिरी केली आहे; परंतु रिओ आॅलिम्पिकमध्ये तो पदक जिंकू शकला नाही. जीतू राय याच्या नावाची शिफारस केल्याविषयी भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी दुजोरा दिला.
२९ वर्षीय राय पुरुषांच्या १0 मीटर एअर पिस्टल प्रकारात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे आणि तो रिओत फायनलमध्ये पोहोचणाऱ्या दोन भारतीय नेमबाजांपैकी एक होता. त्याच्याशिवाय अभिनव बिंद्रानेदेखील अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.
राय पुरुषांच्या १0 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत फायनलमध्ये पोहोचला होता व त्याला आठव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तथापि, रियोत आपली आवडती स्पर्धा ५0 मीटर पिस्टलच्या फायनलसाठी तो पात्र ठरू शकला नव्हता. खेलरत्न हा देशातील सर्वात मोठा खेळातील पुरस्कार आहे.
यावर्षी रायने आयएसएसएफ विश्वकप १0 मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर बँकॉकमध्ये आयएसएसएफ विश्वकप ५0 मीटर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. राय २0१४ मध्ये स्पेन येथे नेमबाजी विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकून रिओ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला नेमबाज होता.
रायफल संघटनेची शिफारस मंजूर झाल्यास या नेमबाजाला २९ आॅगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. आतापर्यंत खेलरत्न पुरस्कार नेमबाजीत आॅलिम्पिकम सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि रंजन सोढी याला मिळाला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Jitu Rai recommended for Khel Ratna Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.