जोहान क्रोइफ यांचं कॅन्सरने निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2016 07:51 PM2016-03-24T19:51:24+5:302016-03-24T21:20:33+5:30

डचचे महान फुटबॉलपटू जोहान क्रोइफ यांचं आज राहत्या घरी कॅन्सरने निधन झाले आहे, ते ६८ वर्षांचे होते.

Johann Croft dies of cancer | जोहान क्रोइफ यांचं कॅन्सरने निधन

जोहान क्रोइफ यांचं कॅन्सरने निधन

Next

ऑनलाइन लोकमत

बार्सिलोना, दि. २४ - डचचे (नेदरलँड्स) महान फुटबॉलपटू जोहान क्रोइफ यांचं आज राहत्या घरी कॅन्सरने निधन झाले आहे, ते ६८ वर्षांचे होते. ब-याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. ३ वेळा त्यांची जागतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपट्टू म्हणून निवड झाली होती. १९७४ मध्ये हॉलंड संघाने त्यांच्या नेतृत्वामुळे अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर ८ वर्ष ते बर्सोलिनाच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत होते.
योहान क्रायफ यांनी १९६४ ते १९८४ या वीस वर्षांच्या कालावधीत फुटबॉलविश्वावर आपल्या अनोख्या शैलीचा ठसा उमटवला. योहान क्रायफ यांच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सनं १९७४ साली फिफा विश्वचषकाचं उपविजेतेपद मिळवलं होतं.
१९७८ सालच्या विश्वचषक उपविजेत्या नेदरलँड्सच्या संघातही त्यांचा समावेश होता. योहान क्रायफ यांनी नेदरलँड्सकडून ४८ सामन्यांमध्ये ३३ गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला होता. योहान क्रायफ यांनी व्यावसायिक फुटबॉलमध्येही मोठं नाव कमावलं. क्रायफ यांनी आएक्स आणि बार्सिलोनासारख्या युरोपातल्या बलाढ्य संघांचं प्रतिनिधित्त्व केलं.


व्यावसायिक फुटबॉलमध्ये योहान क्रायफ यांच्या नावावर ६६१ सामन्यांमध्ये ३६९ गोल जमा आहेत. योहान क्रायफ यांना १९७१, १९७३ आणि १९७४ साली बॅलन डी ओर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. फुटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर क्रायफ यांनी आएक्स आणि बार्सिलोनाच्या प्रशिक्षकपदाचीही भूमिका बजावली. क्रायफ यांनी बार्सिलोनाला चारवेळा स्पॅनिश ला लीगाचं विजेतेपद मिळवून दिलं होतं.

Web Title: Johann Croft dies of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.