'जोको'ला ताज
By admin | Published: July 13, 2015 09:45 AM2015-07-13T09:45:39+5:302015-07-13T09:48:14+5:30
सर्बियाच्या नोवाक जोकोविचने रॉजर फेडररचा पराबव करत विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरले.
फेडररचा चार सेट्समध्ये पराभव
लंडन: कधी फेडरर तर कधी जोकोविच.... अशा सुरूवातीच्या दोन सेट्समध्ये रंगलेल्या अंतिम सामन्यात अखेर बाजी मारली ती सर्बियाच्या नोवाक जोकोविचने. टेनिससम्राट म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचे स्वप्न त्याने पुन्हा भंग केले. फेडररला विम्बल्डनचा आठवा किताब पटकावण्याची संधी होती मात्र त्याला 'जोको'वर भारी पडता आले नाही.
जोकोविचने फेडररचा दोन तास ५६ ५६ मिनिटे चाललेल्या सामन्यात ७-६(१), ६-७(१०), ६-४,६-३ अशा फरकाने पराभव केला. नोवाक जोकोविचचे हे सलग दुस-यांदा विम्बल्डनचे जेतेपद तर एकूम तिसरा विम्बल्डन ताज आहे. कारकिर्दीतील हा त्याचा ९वा ग्रँडस्लॅम आहे. येथील ऑल इंग्लंड टेनिस कोर्टवर रंगलेल्या सामन्यात जोकोविचने दमदार सुरूवात केली होती. त्याने टायब्रेकरवर पहिला सेट जिंकला. या सेटमध्ये फेडरर जेव्हा ६-५ अशा आघाडीवर होता तेव्हा दोनवेला सेट आपल्या नावे करण्याची संधी होती.