जोको-मरे फायनलमध्ये
By admin | Published: June 4, 2016 02:20 AM2016-06-04T02:20:59+5:302016-06-04T02:20:59+5:30
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आॅस्ट्रियाचा युवा खेळाडू डोमेनिक थिएम याला टेनिसचा धडा शिकविताना शुक्रवारी
जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आॅस्ट्रियाचा युवा खेळाडू डोमेनिक थिएम याला टेनिसचा धडा शिकविताना शुक्रवारी ६-२, ६-१, ६-४ असे त्याचे आव्हान उद्ध्वस्त करताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत फायनलमध्ये धडक मारली. फायनलमध्ये त्याची लढत अॅण्डी मरेशी होणार आहे.
११ ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील विजेता जोकोविच प्रथमच फ्रेंच ओपनमध्ये चॅम्पियन बनण्यास आणि करिअर ग्रॅण्डस्लॅम पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. जोकोविचने १५ विनर्स मारले आणि सहा ब्रेक गुण जिंकले. थिएमजवळ चार वेळेस ब्रेक गुणची संधी होती; परंतु त्याची अनुभवी सर्बियन खेळाडूसमोर टिकाव लागू शकला नाही व त्याला फक्त एकच ब्रेक गुण मिळवता आला.
जोकोविच सहा वेळेसचा आॅस्ट्रेलियन ओपन, तीन वेळेस विम्बल्डन आणि दोन वेळेस यूएस ओपनमध्ये विजेतेपद पटकावले आहे; परंतु फ्रेंच ओपनमध्ये त्याला २0११, २0१४ आणि २0१५ ला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
ब्रिटनचा जागतिक क्रमवारीतील द्वितीय स्थानी असलेल्या अॅण्डी मरेने दिमाखदार कामगिरीसह अंतिम फेरी गाठताना फ्रेंच विजेतेपदासाठी बलाढ्य नोवाक जोकोविचपुढे तगडे आव्हान उभे केले आहे. मरेने उपांत्य सामन्यात गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाला ६-४, ६-२, ४-६, ६-२ असा धक्का देत अंतिम फेरी गाठली.