जॉन्टी ऱ्होड्सला पुत्ररत्न, "इंडिया"ला भेटला भाऊ
By admin | Published: May 22, 2017 12:33 PM2017-05-22T12:33:23+5:302017-05-22T18:17:15+5:30
रविवारचा दिवस मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्ससाठी दुहेरी आनंदाचा ठरला. काल संध्याकाळी जॉन्टीची पत्नी मिलानी हिने पुत्राला जन्म दिला
Next
मुंबई, दि. 22 - रविवारचा दिवस मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जॉन्टी ऱ्होड्ससाठी दुहेरी आनंदाचा ठरला. काल संध्याकाळी जॉन्टीची पत्नी मिलानी हिने पुत्राला जन्म दिला. तर रात्री मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावत आपल्या प्रशिक्षकाचा आनंद द्विगुणित केला. याआधी जॉन्टीच्या पत्नीने भारतातच एका मुलीला जन्म दिला होता. भारतात जन्मल्याने जॉन्टीने तिचे नाव इंडिया असे ठेवले होते. आता भारतभूमीवरच इंजियाला भाऊ भेटला आहे. आता मुलग्याचा जन्मही भारतात झाल्याने जॉन्टी त्याचे नाव काय ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पत्नीच्या प्रसुतीवेळी जॉन्टी तिच्यासोबत नव्हता. काल मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यातील आयपीएलच्या अंतिम लढतीसाठी तो हैदराबादला गेला होता. दरम्यान मुंबईतील सूर्या हॉस्पिटलमध्ये जॉन्टीच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. पत्नीची प्रसुती झाल्यावर जॉन्टीने ट्विटरवरून आपल्या जगभरातील चाहत्यांना कळवली.
याआधी 23 एप्रिल 2015 रोजी आयपीएल सुरू असतानाच जॉन्टी ऱ्होड्सच्या पत्नीने भारतातच मुलीला जन्म दिला होता. त्यावेळी आपली मुलगी भारतात जन्मल्याने जॉन्टीने कौतुकाने तिचे नाव इंडिया असे ठेवले होते. योगायोगाची बाब म्हणजे जॉन्टीला मुलगी झाली त्यावेळीही मुंबई इंडियन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावण्याची किमया साधली होती. तर काल त्याला मुलगा झाल्यावरही मुंबईचा संघ आयपीएलमध्ये विजेता ठरला. अशा प्रकारे जॉन्टीच्या दोन्ही मुलांचा पायगुण मुंबई इंडियन्ससाठी यशदायी ठरला.
The prize before the prize @mipaltan? Nathan John "plunged" into the world at 6:20pm on IPL final #poolbirth#earthmother#incredibleindiapic.twitter.com/UiUCMt4fih
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) May 21, 2017