्रजम्प रोप स्पर्धा

By admin | Published: July 12, 2014 10:06 PM2014-07-12T22:06:24+5:302014-07-12T22:06:24+5:30

राज्य जम्प रोप स्पर्धेत पहिल्या

The Jumpsuit Rope Tournament | ्रजम्प रोप स्पर्धा

्रजम्प रोप स्पर्धा

Next
ज्य जम्प रोप स्पर्धेत पहिल्या
दिवशी नाशिकचे वर्चस्व
नागपूर: आजपासून येथील सवार्ेदय आश्रममध्ये सुरू झालेल्या दोन दिवसांच्या राज्य जम्प रोप स्पर्धेत पहिल्या दिवशी नाशिकच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. १८ वर्षे गटाच्या स्पीड प्रकारात मुलांमध्ये नाशिकचा खेळाडू अनिमेष भावसार आणि मुलींमध्ये निशा कुळकर्णी यांनी बाजी मारली.
३० सेकंद फ्री स्टाईल प्रकारात मुलांच्या गटात सातारा संघाचा कौस्तुभ सुतार आणि मुलींच्या गटात नागपूरची खेळाडू तनया देशपांडे यांनी प्रथम स्थान संपादन केले.
त्याआधी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन नागपूरचे महापौर प्रा. अनिल सोले यांनी केले. यावेळी व्यासपीठावर राज्य जम्प रोप असोसिएशनचे सचिव अशोक दुधारे, भाजप द. पश्चिम युवा मोर्चाचे मंत्री विपीन खिरटकर, नागपूर जिल्हा जम्प रोप असोसिएशनच्या सचिव स्नेहलता भगत, अध्यक्ष मो. शोएब, सुमित मोजे, आकाश ठाकरे, दीपक आयलवार, अभिलाष बारापात्रे, दामिनी रंभाड, सागर भगत यांची उपस्थिती होती. स्पर्धेत नागपूरसह मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नांदेड, सातारा, सांगली, परभणी, वाशिम, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले आहेत.
निकाल:१८ वर्षे मुले:स्पीड वैयक्तिक प्रकार- अनिमेष भवसार नाशिक, पीयूष बोडे नाशिक, आदित्य चोरमुले कोल्हापूर. मुली:निशा कुळकर्णी नाशिक, वनश्री जोशी ठाणे, प्रतीक्षा तिडके लातूर.
फ्री स्टाईल:कौस्तुभ सुतार सातारा, प्रवेश पाटील नाशिक, साईराज शिंदे सातारा. मुली: तनया देशपांडे नागपूर, शिवानी जाधव सातारा, कामिनी शेटे नाशिक. (क्रीडा प्रतिनिधी )

Web Title: The Jumpsuit Rope Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.