हरजितकडे ज्युनिअर हॉकी संघाची धुरा
By admin | Published: July 11, 2015 01:38 AM2015-07-11T01:38:59+5:302015-07-11T01:38:59+5:30
नेदरलँड येथे १८ ते २५ जुलैदरम्यान होणाऱ्या २१ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी भारताने १८ खेळाडूंच्या पुरुष संघाची घोषणा केली असून,
नवी दिल्ली : नेदरलँड येथे १८ ते २५ जुलैदरम्यान होणाऱ्या २१ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी भारताने १८ खेळाडूंच्या पुरुष संघाची घोषणा केली असून, संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मिडफिल्डर हरजितसिंग याच्याकडे सोपविण्यात आली आहे.
एकूण ६ देशांमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतासह यजमान नेदरलँड, जर्मनी, इंग्लंड, बेल्जियम आणि न्यूझीलंड या देशांमध्ये विजेतेपदाची चुरस रंगेल. गेल्या महिन्यात झालेल्या सराव शिबिरातून भारताच्या युवा संघाची निवड झाली असून, या स्पर्धेत या खेळाडूंकडून चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेतून मलेशिया येथे रंगणाऱ्या आगामी ज्युनिअर आशियाई चषक व पुढील वर्षीच्या एफआयएच ज्युनिअर वर्ल्डकप स्पर्धेसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची नामी संधी खेळाडूंना असल्याने प्रत्येक खेळाडू आपला सर्वोत्तम खेळ करण्याच्या प्रयत्नात असेल. हरजितसिंग कर्णधार
असलेल्या या भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी डिफेंडर दीप्सन
तिर्की याची निवड झाली
आहे.
भारतीय संघ :
गोलरक्षक : पंकजकुमार रजक, सूरज करकेरा.
डिफेंडर : दीप्सन तिर्की (उपकर्णधार), विक्रमजितसिंग, हरमनप्रीतसिंग, वरुणकुमार, बलजितसिंग आणि आनंद लाक्रा.
मिडफिल्डर : हरजितसिंग (कर्णधार), संतासिंग, मनप्रीत, नीलकांत शर्मा आणि अजय यादव.
फॉर्वडर : सुमीतकुमार, अरमान कुरेशी, परविंदरसिंग, गुरजंतसिंग आणि सिमरनजीत सिंग.
(वृत्तसंस्था)