जोकोची ‘सिनसिनाटी’ हार

By admin | Published: August 16, 2014 12:10 AM2014-08-16T00:10:26+5:302014-08-16T00:10:26+5:30

विम्बल्डन चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच याला सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत तिसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

Junkie 'Cincinnati' necklace | जोकोची ‘सिनसिनाटी’ हार

जोकोची ‘सिनसिनाटी’ हार

Next

सिनसिनाटी : विम्बल्डन चॅम्पियन सर्बियाचा नोवाक जोकोव्हिच याला सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत तिसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. जागतिक क्रमवातील अव्वल स्थानावर असलेल्या जोकोला स्पेनच्या टॉमी रॉब्रेडोकडून हा पराभव पत्करावा लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आगामी यूएस ओपनमध्ये १६वे मानांकन मिळालेल्या रॉब्रेडोने जोकोवर ७-६ (८-६), ७-५ असा दणदणीत विजय मिळवला. जोकोला २५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या वर्षाच्या शेवटच्या ग्रॅण्ड स्लॅममध्ये या पराभवाच्या आठवणी घेऊन उतरावे लागणार आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वासही कुठेतरी डळमळला असेल.
रॉब्रेडोला पुढील फेरीत स्पेनच्याच डेविड फेररशी मुकाबला करावा लागेल. फेररने रुसच्या मिखाइल युज्नीवर ७-५, ६-० असा विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित आणि पाच वेळा सिनसिनाटी मास्टर्सचा किताब पटकावणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने फ्रान्सच्या गेल मोनफिसचा तीन सेटमध्ये रंगलेल्या लढतीत ६-४, ४-६, ६-३ असा विजय साजरा केला. फेडररला उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंच्या अ‍ॅण्डी मरेशी मुकाबला करावा लागेल. मरेने अमेरिकेच्या जॉन इशनरचा दोन तास चाललेल्या लढतीत ६-७, ६-४, ७-६ असा पराभव केला. आॅस्ट्रेलियन ओपनचा चॅम्पियन स्टेन वावरिंका यानेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. तिसऱ्या मानांकित या खेळाडूने क्रोएशियाच्या मारिन सिलिचचा ३-६, ६-०, ६-१ असा पराभव केला, तर फॅबिओ फॉग्नीनी याने पहिला सेट गमावूनही दमदार कमबॅक करून टायवानच्या लू येन हसुनचा ३-६, ६-३, ६-३ असा पराभव केला.

Web Title: Junkie 'Cincinnati' necklace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.