ज्वाला-अश्विनीची ‘चांदी’
By admin | Published: August 4, 2014 03:05 AM2014-08-04T03:05:20+5:302014-08-04T03:05:20+5:30
महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
ज्वाला-अश्विनी जोडीला २0१0 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.
या भारतीय जोडीला विवियान काह मून हू आणि खे वेई वून या १८व्या मानांकित मलेशियन जोडीने १७-२१, २१-२३ असे पराभूत केले.
राष्ट्रकुल स्पर्धेतील दमदार कामगिरीबद्दल बॅडमिंटन असोसिएशन आॅफ इंडियाने खेळाडूंना पारितोषिके जाहीर केली आहेत.
सुवर्णपदक विजेत्या पी. कश्यपला २५ लाख रुपये देण्यात येतील. रौप्यविजेती जोडी अश्विनी आणि ज्वाला यांना प्रत्येकी १0 लाख रुपये, तर कांस्यपदक विजेत्या सिंधू आणि गुरुसाईदत्त यांना प्रत्येकी पाच लाख देण्यात येणार आहे.