ज्वाला गट्टा-अश्विनी पोनप्पा उपांत्य फेरीत
By admin | Published: June 28, 2015 01:42 AM2015-06-28T01:42:43+5:302015-06-28T01:42:43+5:30
भारताची अव्वल महिला दुहेरी जोडी ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी दुहेरीत हॉँगकॉँगच्या चान काका व यूवेन सिन यिंग जोडीचा सहज पराभव करून कॅनडा
भारताची अव्वल महिला दुहेरी जोडी ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांनी दुहेरीत हॉँगकॉँगच्या चान काका व यूवेन सिन यिंग जोडीचा सहज पराभव करून कॅनडा ओपन बॅडमिंटन ग्रांप्री स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये आपली जागा निश्चित केली.
राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य आणि २०११ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कास्यपदक जिंकलेल्या ज्वाला-अश्विनी जोडीने चान व यूवेनला २१-१९, २१-१३ गुणांनी नमविले.
तिसरे मानांकन असलेल्या ज्वाला-अश्विनी जोडीचा पुढील सामना जपानच्या शिंहो तनाका व कोहारू योनेमोटो यांच्याविरुद्ध होईल.
दहाव्या मानांकित प्रणीतला माजी नंबर वन ली चांग वेईकडून १३-२१, २१-१८, ११-२१; तर नववे मानांकन असलेल्या जयरामला अग्रमानांकित जर्मनीच्या मार्क जव्हिबलेरकडून १६-२१, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले. महिलांच्या दुहेरीत प्रज्ञा गद्रे व सिक्की रेड्डीला हॉँगकॉँगच्या पुन लाक यान व यिंग सुवेट जोडीकडून १८-२१, २५-२३, १५-२१ गुणांनी हार पत्करावी लागली.