कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 07:26 PM2019-12-26T19:26:12+5:302019-12-26T19:27:01+5:30

पुरुषांत जय भारत क्रीडा मंडळाने हा विजेतापदाचा मान पटकाविला. 

Kabaddi: Bank of Baroda and Air India win tittle | कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद

कबड्डी : बँक ऑफ बडोदा आणि एअर इंडिया यांना जेतेपद

Next

 मुंबई :  बँक ऑफ बडोदा(देना बँक), एअर इंडिया यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित आणि मुंबई शारीरिक शिक्षण मंडळने पुरस्कृत केलेल्या “जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी” स्पर्धेच्या अनुक्रमे महिला व्यावसायिक आणि पुरुष विशेष व्यावसायिक गटाच्या चषकावर आपले नाव कोरले. महिला गटात शिवशक्ती मंडळाने, तर प्रथम श्रेणी पुरुषांत जय भारत क्रीडा मंडळाने हा विजेतापदाचा मान पटकाविला. 

    नायगाव मुंबई येथील भारतीय क्रीडा क्रीडा मंदिराच्या क्रीडांगणावर संपन्न झालेल्या महिला व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्या बँक ऑफ बडोदा(देना बँक) स्पोर्ट्सने जे.जे. रुग्णालयाचा २६-०५ असा धुव्वा उडवीत या गटाचे विजेतेपद सहज आपल्या नावे केले. मध्यांतराला २२-०४ अशी आघाडी घेत बँकेने आपला विजय निश्र्चित केला होता. बँकेच्या साक्षी रहाटे, पौर्णिमा जेधे यांच्या झंजावाती चढाया रोखणे जेजेच्या महिलांना जमत नव्हते, तर आरती पाटील, साधना विश्वकर्मा यांचा बचावही भेदून गुण मिळविणे शक्य होत नव्हते. दोन संघातील फरकच या सामन्याचे चित्र स्पष्ट करते. जेजेच्या अक्षया कुटेला या सामन्यात सूर सापडला नाही. 

  विशेष व्यावसायिक पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने बँक ऑफ बडोदा(देना बँक)ला ३७-१३असे लीलया पराभूत करीत कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी स्मृती चषकावर आपले नाव कोरले. या पराभवासमुळे बँकेला संमिश्र यशाला सामोरी जावे लागले. पहिल्या डावात २२-०४ आघाडी घेत आपल्या विजयाचा पाया रचला. दुसऱ्या डावात आणखी १५गुण वसूल करीत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. नवनाथ जाधव, आकाश कदम यांच्या धारदार चढाया आणि साईराज कुंभार याच्या भक्कम बचावाला या विजयाचे श्रेय जाते. बँकेचा भरवशाचा भीमकाय खेळाडू नितीन देशमुख (खली) याला या सामन्यातुन गुण मिळविणे जमत नव्हते. यामुळेच बँकेला हा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला. बँकेच्या आकाश गोजारेचा देखील या सामन्यात प्रभाव पडला आला नाही.

   प्रथम श्रेणी पुरुषांच्या अंतिम सामन्यात जय भारत क्रीडा मंडळासने अंकुर स्पोर्ट्सला २५-२२ असे चकवीत “स्व. राजाराम पवार स्मृती चषक” आपल्याकडे खेचून आणला. पूर्वार्धात १०-१३ अशा ३गुणांनी पिछाडीवर पडलेल्या जय भारतने ही किमया साधली. जय भारतच्या ओमकार मोरे, अक्षय जाधव, अविनाश कावीलकर यांनी उत्तरार्धात जोरदार कमबॅक करीत हा विजय साकारला. सुशांत साईल, अभिजित दोरुगडे, आशिष सातारकर यांनी पूर्वार्धात चतुरस्त्र खेळ करीत अंकुर स्पोर्टसला आघाडी मिळवून दिली होती. पण उत्तरार्धात तोच खेळ व तोच जोश त्यांना राखता न आल्यामुळे त्यांना हा पराभव पत्करावा लागला.

   महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्ती महिला (अ) संघाने डॉ. शिरोडकर स्पोर्ट्सचा ५१-१८ असा मोठ्या फरकाने पराभव करीत “स्व. प्रभाकर(दादा) अमृते स्मृती चषक” वर आपले नाव कोरले. विश्रांतीला २३-१२ आघाडी घेणाऱ्या शिवशक्तीने विश्रांतीनंतर देखील त्याच त्वेषाने खेळ करीत हा विजय सोपा केला. पूजा यादव, ऋणाली भुवड यांच्या धारदार चढाया, त्याला साधना विश्वकर्मा, आरती पाटिल यांनी दिलेली भक्कम पकडीची साथ यामुळे हे सहज शक्य झाले. धनश्री पोटले, तेजश्री चौगुले, साक्षी यांचा खेळ डॉ. शिरोडकरचा पराभव टाळण्यास फारच कमी पडला.

Web Title: Kabaddi: Bank of Baroda and Air India win tittle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.