कबड्डी : पुणे आणि ठाणे संघांनी पटकावली जेतेपदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 10:31 PM2020-02-05T22:31:03+5:302020-02-05T22:32:02+5:30

पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन सखाराम पांडे  या फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मद्यंतराला पुणे संघाकडे 22-11 अशी आघाडी होती. पुण्याच्या मानसी रोडे, पल्लवी गावडे व समृध्दी कोळेकर यांच्या खोलवर चढायांच्या जोरावर हा सामना पुणे जिल्ह्याने जिंकला.

Kabaddi: Pune and Thane teams won the title | कबड्डी : पुणे आणि ठाणे संघांनी पटकावली जेतेपदे

कबड्डी : पुणे आणि ठाणे संघांनी पटकावली जेतेपदे

googlenewsNext

 कुमार गटात स्वर्गीय नारायण नागु पाटील यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पुरस्कृत फिरत्या चषकाचा मान ठाणे जिल्हा या संघाने मिळविला. तर कुमारी गटात क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन सखाराम पांडे परभणी यांच्या स्मरणार्थ फिरता चषकावर पुणे जिल्ह्याने आपले नाव कोरले.

कुमारी गटात झालेल्या अंतिम लढतीत पुणे जिल्हा संघाने बीड जिल्हा संघावर 35-27 गुणांनी विजय मिळवित क्रीडा शिक्षक स्वर्गीय चंदन सखाराम पांडे  या फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मद्यंतराला पुणे संघाकडे 22-11 अशी आघाडी होती. पुण्याच्या मानसी रोडे, पल्लवी गावडे व समृध्दी कोळेकर यांच्या खोलवर चढायांच्या जोरावर हा सामना पुणे जिल्ह्याने जिंकला. तर दिव्या गोगावले व नागेंद्रा कुरा यांनी चांगल्या पकडी घेतल्या. बीडच्या शितल म्हेत्रे, आरती नागरे चौफेर चढाया करीत चांगली लढत दिली. तर आश्वनि शेळके हिने चांगल्या पकडी घेतल्या.

कुमार गटात अंतिम सामन्यात ठाणे जिल्हा संघाने रत्नागिरी या संघावर 32-23 अशा गुणांनी विजय मिळवित कुमार गटात स्वर्गीय नारायण नागु पाटील यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन पुरस्कृत फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. मध्यंतराला ठाणे जिल्हा संघाकडे 16-9 अशी आघाडी होती. ठाण्याच्या गौरव पाटील व परेश हरड याने चौफेच चढाया करीत मैदान दणाणून सोडले. तर वैभव पाटील व पवनकुमार सिंग याने चांगल्या पकडी घेतल्या. रत्नागिरीच्या विवेक जांभळे व प्रतिक चव्हाण यांनी उत्कृष्ट चढाया केल्या. तर साईराज जाधव याने काही चांगल्या पकडी घेत विजयासाठी संघर्ष केला.  

Web Title: Kabaddi: Pune and Thane teams won the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.