कबड्डी वर्ल्डकप : भारताची अंतिम फेरीत धडक

By admin | Published: October 21, 2016 11:38 PM2016-10-21T23:38:33+5:302016-10-21T23:49:06+5:30

बलाढय व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलंडवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या रात्री ८ वाजता इराणसोबत भारताचा अंतिम सामना रंगणार आहे.

Kabaddi World Cup: India beat in final | कबड्डी वर्ल्डकप : भारताची अंतिम फेरीत धडक

कबड्डी वर्ल्डकप : भारताची अंतिम फेरीत धडक

Next

ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. २१ : बलाढय व संभाव्य विजेत्या भारताने विश्वचषक कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत थायलंडवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. उद्या रात्री ८ वाजता इराणसोबत भारताचा अंतिम सामना  रंगणार आहे.

आजच्या सामन्यात अत्यंत एकतर्फी झालेल्या या लढतीत भारताने अपेक्षित विजय मिळवताना थायलंडला सहजपणे नमवले. त्यामुळे अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित करण्यासाठी भारतीय खेळाडूंना विशेष मेहनत घ्यावी लागली नाही. थायलंडचा दुबळा बचाव आणि कमजोर आक्रमण याचा चांगलाच समाचार घेताना भारतीयांना थायलंडला कबड्डीचे धडेच दिले.

उपांत्य फेरीतील भारत-थायलंड सामना रोमंचक होईल असे वाटले होते. मात्र भारताने पहिल्या हाफमध्ये ३६-८ अशी अाघाडी मिळवत २४ गुणांची आघाडी घेतली. पहिल्या हापमधील आघाडी दुसऱ्या हाफमध्येही कायम ठेवली. दुसऱ्या हाफमध्ये थायलंडने प्रतिकाराचा अपयशी प्रयत्न केला. भारताने थायलंडवर ६३-२० अशा फरकाने मोठा विजय मिळवत अखेर अंतिम फेरीत धडक मारली. भारतातर्फे स्टार खेळाडू प्रदीप नरवाल, अजय ठाकूर, सुरजीत आणि सुरेंदर नाडा यांनी भक्कम पकड करताना थायलंडच्या आक्रमणाला रोखले. तसेच, संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ आणि राहुल चौधरी व नितीन तोमर यांची आक्रमक खेळी देखील निर्णायक ठरली. 

Web Title: Kabaddi World Cup: India beat in final

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.