' ये कलाई हमका दे दे लक्ष्मण' - वीरूच्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा...

By admin | Published: November 1, 2016 10:54 AM2016-11-01T10:54:59+5:302016-11-01T10:54:59+5:30

क्रिकेटच्या मैदानावर जोरदार फलंदाजी करत गोलंदाजांची पिसे काढण्यात तरबेज असलेला भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग ऑफ दि फिल्डही धुवांधार फलंदाजी करतो

'This Kala Humaa De Laxman' - Happy Birthday to Viru ... | ' ये कलाई हमका दे दे लक्ष्मण' - वीरूच्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा...

' ये कलाई हमका दे दे लक्ष्मण' - वीरूच्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा...

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - क्रिकेटच्या मैदानावर जोरदार फलंदाजी करत गोलंदाजांची पिसे काढण्यात तरबेज असलेला भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग ऑफ दि फिल्डही धुवांधार फलंदाजी करतो. उत्कृष्ट ' सेन्स ऑफ ह्युमर' असलेला खेळाडू अशी ख्याती असलेला सेहवाग सोशल नेटवर्किंग साईटवरील आपल्या पोस्ट्समुळे नेहमीच चर्चेत असो. मग त्या ' क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला' दिलेल्या शुभेच्छा असोत वा इंग्रजांची कळ काढत पत्रकार पिअर्स मॉर्गनला मारलेले टोले.. वीरूची ही फटकेबाजी नेटीझन्स नेहमीच एन्जॉय करतात. 
आज पुन्हा एकदा वीरूने आपला हटके अंदाज दाखवत भारताच्या श्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या व्ही.व्ही. एस. लक्ष्मणला वाढदिवसाच्या शुभेच्छ्या दिल्या आहेत. ' फलंदाजी करताना लक्ष्मण ज्या पद्धतीने आपल्या मनगटाचा सहज वापर करून चेंडू सीमापार फटकावत असे ते सर्वांनाच माहीत आहे'. त्याच पार्श्वभूमीवर वीरूने ट्विट करत लक्ष्मणचे अभिष्टचिंतन केले आहे.
यापूर्वीही वीरूने अनेकवेळा ट्विटरवरून आपल्या अनोख्या अंदाजाचे दर्शन घडवले आहे. नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळालेल्या फिरकीपटू आर.अश्विनवर सेहवागने मजेशीर टि्वट केले. सेहवागने आपल्या हटके अंदाजात अश्विनचे अभिनंदन केले होते. 'सातव्यांदा मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अश्विनला शुभेच्छा, फक्त विवाहित पुरूषालाच घरी लवकर जाण्याचे महत्त्व समजू शकते', असे मजेशीर टि्वट सेहवागने केले. 
तसेच सचिन तेंडुलकरचीही त्याने मजा घेतली होती. न्युझीलंडविरोधातील  दुसरा कसोटी सामना भारताने जिंकला  व त्यानंतर सचिन तेंडूलकरने भारतीय संघाचं कौतुक करणारं ट्विट केलं होतं. 'विजयाबद्दल आणि पहिल्या क्रमांकावर आल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन' असं तेंडूलकरने ट्विटमध्ये म्हटलं होतं. नेमकी हीच संधी साधत सामन्यावेळी कॉमेंट्री करणा-या विरेंद्र सेहवागने 'देवा कधीतरी कॉमेंटेटरलाही प्रोत्साहित करत जा' असं ट्विट सचिनला उद्देशून केलं होतं. सचिन तेंडूलकरने लगेच ट्विटला उत्तर देत 'जियो मेरे लाल...तथास्तू' असं लिहिलं होतं. सचिन तेंडूलकरला आपण फुल टॉस टाकला आहे याची कल्पनाही सचिन तेंडूलकरला नव्हती. आणि अपेक्षेप्रमाणे सेहवागने षटकार ठोकला. काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने जिओ सीमकार्ड लाँच केलं आहे. तसंच रिलायन्सचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सचा सचिन तेंडूलकर कप्तान होता. नेमकी हीच संधी सेहवागने साधली आणि उत्तर दिलं. 'आशिर्वाद देतानाही आपल्या मालकाच्या ब्रँण्डचा (जिओ) उल्लेख करणं विसरत नाही' असं ट्विट करत सेहवागने सचिनला निरुत्तर करुन टाकलं.
(VIDEO- का म्हणतो तेंडुलकर सेहवागला 'लाला'?)
(सेहवागने पुन्हा काढली इंग्रजांची कळ...)
(चॅरिटीविषयी बोलायचं, तर तुम्हीच आम्हाला 'कोहिनूर' देणं लागता - सेहवागचा इंग्रजांना टोला)
(ट्विटरवरील सामन्यात सचिन तेंडूलकरच्या गोलंदाजीवर सेहवागचा षटकार)
 
 
 
 
तर रिओ ऑलिम्पिकमध्ये  रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रीडापटूंनी जिंकलेल्या पदकांवरून खिल्ली उडवण्याची इंग्लंडमधील पत्रकार पिअर्स मॉर्गनलाही वीरूने चांगलंच सुनावलं होतं. . मॉर्गनने ट्विटरवरून पुन्हा ऑलिम्पिक मेडल्सचा विषय कढत माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला डिवचत त्याला आव्हान दिले.  'इंग्लंडने वर्ल्डकप जिंकायच्या आधी भारताने ऑलिम्पिकमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळवून दाखवलं तर, मी दहा लाख रुपये समाजसेवेसाठी देईन, सेहवाग तुला हे आव्हान मान्य आहे?' असे ट्विट त्याने केले.  त्यावर सेहवागनेही त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिले.  ' मॉर्गन, भारताकडे आधीच नऊ सुवर्णपदकं आहेत, (पण) इंग्लंडकडे एकही वर्ल्डकप नाही.  आणि चॅरिटीविषयीच बोलायचं झालं तर,  तुम्हीच (इंग्रज) आम्हाला "कोहिनूर" देणं लागता' असे ट्विट करत सेहवागने त्याला सुनावले
 

Web Title: 'This Kala Humaa De Laxman' - Happy Birthday to Viru ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.