सॉफ्टबॉलचा आंतरराष्ट्रीय खेळाडू कल्पेश कोल्हे
By Admin | Published: March 23, 2017 05:18 PM2017-03-23T17:18:32+5:302017-03-23T17:18:32+5:30
जळगाव : सॉफ्टबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या जळगावात कल्पेश कोल्हे नावाचा तारा चमकतोय. कल्पेश याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत . २० वर्षांचा कल्पेश हा २००६ पासून म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षापासून सॉफ्टबॉल खेळत आहे. सॉफ्टबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ.प्रदीप तळवेलकर यांच्या पारखी नजरेने कल्पेशच्या गुणांना हेरले. किशोर चौधरी, सचिन जगताप, अरुण श्रीखंडे या सहकार्यांच्या मदतीने कल्पेशच्या खेळाला पैलु पाडले. त्याच्या अफलातून कौशल्याच्या जोरावर कल्पेशची निवड पराना, अर्जेंटिनात झालेल्या नवव्या ज्युनियर मेन्स सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली होती. कल्पेश याने आतापर्यंत १२ राष्ट्रीय स्पर्धांत राज्य संघाचे नेतृत्व केले आहे. त्यासोबत पहिल्या इंडिया बॅटल सॉफ्टबॉल लीगमध्येही त्याने महाराष्ट्र संघाकडून
ज गाव : सॉफ्टबॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या जळगावात कल्पेश कोल्हे नावाचा तारा चमकतोय. कल्पेश याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत . २० वर्षांचा कल्पेश हा २००६ पासून म्हणजेच वयाच्या नवव्या वर्षापासून सॉफ्टबॉल खेळत आहे. सॉफ्टबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ.प्रदीप तळवेलकर यांच्या पारखी नजरेने कल्पेशच्या गुणांना हेरले. किशोर चौधरी, सचिन जगताप, अरुण श्रीखंडे या सहकार्यांच्या मदतीने कल्पेशच्या खेळाला पैलु पाडले. त्याच्या अफलातून कौशल्याच्या जोरावर कल्पेशची निवड पराना, अर्जेंटिनात झालेल्या नवव्या ज्युनियर मेन्स सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात झाली होती. कल्पेश याने आतापर्यंत १२ राष्ट्रीय स्पर्धांत राज्य संघाचे नेतृत्व केले आहे. त्यासोबत पहिल्या इंडिया बॅटल सॉफ्टबॉल लीगमध्येही त्याने महाराष्ट्र संघाकडून चांगली कामगिरी केली. त्याला या सॉफ्टबॉल लीगमध्ये बेस्ट कॅचरचा पुरस्कार देण्यात आला. सुमेध तळवेलकर, प्रितीश पाटील, जयेश मोरे या आपल्या सहकार्यांच्या मदतीने लीगमध्ये महाराष्ट्र संघाला विजेतेपद मिळवून दिले. अमृतसर येथे झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेतही त्याने उत्कृष्ठ कॅचर ऑफ द टुर्नामेंट चा बहुमान पटकावला होता.