जीएफआयच्या अध्यक्षपदी कंधारी
By admin | Published: January 31, 2015 03:13 AM2015-01-31T03:13:36+5:302015-01-31T03:13:36+5:30
भारतीय जिम्नॅस्टिक संघटनेच्या (जीएफआय) अध्यक्षपदी जसपाल सिंह कंधारी यांची बिनविरोध निवड, तर पंजाब जिम्नॅस्टिक संघटनेचे
चंदिगड : भारतीय जिम्नॅस्टिक संघटनेच्या (जीएफआय) अध्यक्षपदी जसपाल सिंह कंधारी यांची बिनविरोध निवड, तर पंजाब जिम्नॅस्टिक संघटनेचे बी. एस. घुम्मन यांची महासचिव म्हणून निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदीडॉ. एस. शांती कुमार सिंह, तर महाराष्ट्राची मीरा कोर्डे, ओरिसाचे अशोक कुमार साहू आणि पॉण्डेचरीचे एम. दिनकर राजेश्वरन यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदाच्या चौथ्या पदाची निवड होऊ शकली नाही; कारण निवडणूक अधिकारी आणि गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आर.एस. मोंगिया यांना तीन नामांकने प्राप्त झाली आहेत. हिमाचल प्रदेशचे ओ. पी. रानोटे, दिल्लीचे राम दुलारे, झारखंडचे निशिकांत पाठक आणि मध्यप्रदेशचे दिग्विजय सिंह यांना संयुक्त सचिव म्हणून निवडण्यात आले. कार्यकारी समितीमध्ये एम. सोमेश्वर (आंध्र प्रदेश), के. रामचंद्रन (केरळ), अनिल मिश्रा (उत्तरप्रदेश) यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)