कांगारूंचा दमदार सराव

By admin | Published: February 18, 2017 01:21 AM2017-02-18T01:21:32+5:302017-02-18T01:21:32+5:30

भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दमदार सराव करून घेताना बलाढ्य आॅस्टे्रलियाने भारत ‘अ’ विरुद्ध सराव सामन्याच्या

Kangaru's strong practice | कांगारूंचा दमदार सराव

कांगारूंचा दमदार सराव

Next

मुंबई : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी दमदार सराव करून घेताना बलाढ्य आॅस्टे्रलियाने भारत ‘अ’ विरुद्ध सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ५ बाद ३२७ धावा उभारल्या. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१०७) आणि शॉर्न मार्श (१०४) यांनी शतकी खेळी करीत भारतीय संघाला इशारा दिला आहे. त्याचवेळी, भारताच्या गोलंदाजांना कांगारूंना रोखण्यात अपयश आले.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी धोकादायक सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (२५) आणि मॅट रेनशॉ (११) यांना झटपट बाद करून शानदार सुरुवात केली. यावेळी भारतीय गोलंदाज वर्चस्व गाजविणार असेच दिसत होते. मात्र, भारताविरुद्ध हमखास यशस्वी ठरणाऱ्या स्मिथने सर्व सूत्रे आपल्या हाती घेताना मार्शसह संघाचा डाव सावरला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १५६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. दोन्ही फलंदाज वैयक्तिक शतके झळकावून निवृत्त झाले.
स्मिथने १६१ चेंडंूत १२ चौकार आणि एका षट्कारासह १०७ धावांची खेळी केली. तसेच, मार्शने १७३ चेंडंूत ११ चौकार व एका षट्कारासह १०४ धावांची खेळी करून मैदान सोडले. भारतीय गोलंदाज स्मिथ - मार्श यांची कोंडी करण्यात सपशेल अपयशी ठरले. फिरकी मारा चमकदार ठरेल, अशी आशा होती. परंतु, या दोन्ही फलंदाजांनी समर्थपणे फिरकी गोलंदाजी खेळून काढली. आपला शंभरावा प्रथम श्रेणी सामना खेळताना स्मिथने ३०वे प्रथम श्रेणी शतक झळकाविले. शतक पूर्ण झाल्यानंतर त्याने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कमजोर क्षेत्ररक्षणाचा फटकाही भारत ‘अ’ संघाला बसला. पार्ट टाईम स्पिनर अखिल हेरवाडकरच्या गोलंदाजीवर मार्शचा पूल करण्याचा प्रयत्न चुकला. मात्र, नवदीप सैनी मिडविकेटला त्याचा झेल घेण्यात अपयशी ठरला. त्यावेळी मार्श ८८ धावांवर खेळत होता. दरम्यान, क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाल्याने फिरकी गोलंदाज कृष्णप्पा गोथमला मैदानाबाहेर जावे लागले. यामुळे भारतीय फिरकी माऱ्याला मोठा धक्का बसला. त्याचवेळी, दिवसाअखेर त्याने दोन षटके टाकून आपली तंदुरुस्ती आजमावली. त्याचप्रमाणे, पीटर हँड्सकॉम्बने ७० चेंडूंत ३ चौकारांसह ४६ धावा काढल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मिशेल मार्श (नाबाद १६) आणि मॅथ्यू वेड (नाबाद ७) खेळपट्टीवर होते. भारताकडून नवदीप सैनीने २७ धावांत २ बळी घेतले, तर कर्णधार पंड्याला एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)

धावफलक

आॅस्टे्रलिया (पहिला डाव) : डेव्हीड वॉर्नर झे. इशान किशन गो. सैनी २५, मॅट रेनशॉ झे. किशन गो. सैनी ११, स्टीव्ह स्मिथ निवृत्त १०७, शॉन मार्श निवृत्त १०४, पीटर हँड्सकॉम्ब झे. पांचाळ गो. पंड्या ४५, मिशेल मार्श खेळत आहे १६, मॅथ्यू वेड खेळत आहे ७. अवांतर - १२. एकूण : ९० षटकांत ५ बाद ३२७ धावा.
गोलंदाजी : अशोक दिंडा १५. २-१-४९-०; हार्दिक पंड्या १७-३-६४-१; नवदीप सैनी १२.४-४-२७-२; शाहबाज नदीम २३-०-९०-०; अखिल हेरवाडकर ११-०-४८-०; श्रेयश अय्यर ७-०-३२-०; प्रियांक पांचाळ ४-०-११-०.


आत्मविश्वास मिळाला


च्खेळपट्टीवर जास्त वेळ घालविल्याचा आनंद आहे. हा अनुभव खूप मोलाचा असून, यामुळे वाढलेल्या आत्मविश्वासासह भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत खेळेल, अशी प्रतिक्रिया आॅस्टे्रलियाचा फलंदाज शॉर्न मार्शने व्यक्त केली. मार्शने भारत ‘अ’ विरुद्धच्या सराव सामान्यात शानदार शतक झळकावून चांगली सुरुवात केली आहे.
च्मार्श म्हणाला की, ‘जेव्हा पण खेळपट्टीवर जास्त वेळ घालवला जातो, तेव्हा फलंदाजाला नेहमी फायदा होतो. भारताविरुद्ध आश्विन आणि जडेजाकडून कोणत्या प्रकारचा मारा होणार याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यामुळे फलंदाज म्हणून या सराव सामन्यात जास्तीत जास्त फलंदाजीचा सराव करून भारताविरुद्ध् आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा आमचा प्रयत्न राहील.’ त्याचप्रमाणे, ‘सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी आमच्या प्रत्येक खेळाडूने काहीतरी अनुभव मिळवला आहे. पुढील दोन दिवशी कामगिरीत सातत्य ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच या जोरावर पुढील आठवड्यापासून सुरूहोणाऱ्या कसोटी मालिकेत आम्ही चमकदार कामगिरी करू,’ असेही मार्शने म्हटले.

वॉर्नरला बाऊंसरवर बाद करण्याचा अनुभव खूप मोलाचा आहे. डिंडाच्या आखूड टप्प्यावर वॉर्नरला पूल करताना पाहिले, तेव्हा पुन्हा त्याला पूल मारण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी काहीतरी करण्याचा विचार केला. मी चेंडूला अधिक उसळी देण्यात यशस्वी ठरलो याचा आनंद आहे. गोलंदाजी करताना सुरुवातीला मी नर्वस होतो. परंतु, नंतर आत्मविश्वास थोडा वाढल्यानंतर मी अचूक मारा करण्यात यशस्वी ठरलो.
- नवदीप सैनी, मध्यमगती गोलंदाज

Web Title: Kangaru's strong practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.