कन्यारत्न...आर.पी सिंग झाला बाबा
By Admin | Published: February 9, 2017 06:22 AM2017-02-09T06:22:23+5:302017-02-09T06:22:23+5:30
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि पहिल्यांदाज रणजी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघातील स्टार खेळाडू आर.पी.सिंग बाबा झाला आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज आणि पहिल्यांदाज रणजी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघातील स्टार खेळाडू आर.पी.सिंग बाबा झाला आहे. आर.पी सिंगची पत्नी देवांशी हिने बुधवारी चिमुकल्या मुलीला जन्म दिला. बाबा झाल्याची माहिती खुद्ध आर.पी.सिंगने ट्विट करून दिली. ट्विटमध्ये आर.पी.सिंगने आपल्या चिमुकल्या मुलीचे नाव ह्यइरा आर्या सिंगह्ण असे ठेवल्याचे जाहिर केले आहे. मला आणि देवांशीला कन्यारत्नाचा लाभ झाला, याशिवाय दुसरी कोणतीही चांगली भावना असू शकत नाही, असे ट्विट आर.पी.सिंगने केले आहे
आर.पी.सिंगला कन्यारत्नाचा लाभ झाल्याच्या बातमीनंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मनोज तिवारी, इरफान पठाण आणि हरभजनची पत्नी गीता बसरा हिनेही आर.पी.सिंगला शुभेच्छा दिल्या आहेत.
(VIDEO : रणजी अंतिम सामन्यात आर.पी सिंगने घेतला चाहत्याशी पंगा)
2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. या सपर्धेत त्याने लक्षवेधी कामगिरी करताना सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.