नारायण ‘उत्तीर्ण’ केकेआरला दिलासा

By admin | Published: April 9, 2016 02:52 AM2016-04-09T02:52:22+5:302016-04-09T02:52:22+5:30

वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याची गोलंदाजी शैली आयसीसीने ‘ओके’ ठरविली आहे. यामुळे तो स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल.

KARA KARA KNOWLEDGE NARAYANA | नारायण ‘उत्तीर्ण’ केकेआरला दिलासा

नारायण ‘उत्तीर्ण’ केकेआरला दिलासा

Next

वेस्ट इंडीजचा फिरकी गोलंदाज सुनील नारायण याची गोलंदाजी शैली आयसीसीने ‘ओके’ ठरविली आहे. यामुळे तो स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकेल. आयपीएलचा त्याचा संघ कोलकाता नाईट रायडर्सला देखील दिलासा मिळाला आहे.
गोलंदाजी करतेवेळी त्याचे ढोपर आयसीसीने निर्धारित केलेल्या १५ डिग्रीच्या कोपऱ्यातून योग्यरीत्या फिरते, असे आयसीसीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. नारायणच्या गोलंदाजी शैलीत त्रुटी आहेत, असे पंचांना वाटत असेल तर ते पुन्हा नरेनच्या शैलीची तक्रार करू शकतील, असे आयसीसीने म्हटले आहे.
नारायणच्या गोलंदाजी शैलीची दुसरी चाचणी चेन्नईस्थित श्री रामचंद्र युनिव्हर्सिटी सेंटरमध्ये घेण्यात आली. ७ नोव्हेंबर २०१५ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन-डे दरम्यान नारायणच्या गोलंदाजी शैलीची तक्रार करण्यात आली होती.
गोलंदाजी शैली सुधारण्याच्या धडपडीत नारायण हा वर्षभरापासून विंडीज संघाबाहेर आहे. विंडीज क्रिकेट बोर्डाने त्याला टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान दिले होते; पण गोलंदाजी शैलीत अपेक्षेनुरूप सुधारणा न होऊ शकल्याने नारायणने स्वत: माघार घेतली.

Web Title: KARA KARA KNOWLEDGE NARAYANA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.