Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 09:57 AM2018-07-26T09:57:26+5:302018-07-26T11:05:20+5:30

भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो.

KargilVijayDiwas: sports person tribute to Kargil War heroes on Vijay Diwas | Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना

Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धातील शहिदांना क्रीडा विश्वातूनही मानवंदना

googlenewsNext

मुंबई - भारतीय सीमारेषेवर घुसखोरी केलेल्या पाकिस्तानाला 26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने पिटाळून लावले. तब्बल अडीच महिने सुरू राहिलेल्या या युद्धात भारतीय जवानांनी पुन्हा एकदा मायभूमीवर तिरंगा फडकवला. या युद्धात भारतीय सैन्याच्या 527 जवानांना वीरमरण आले होते. या जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 26 जुलै हा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. क्रीडा विश्वातूनही शहिदांना मानवंदना देण्यात आहे. भारताचे माजी कसोटीपटू विरेंद्र सेहवाग आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांच्यासह 2008 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या विजेंदर सिंगनेही श्रद्धांजली अर्पण केली. 



भारतीयांच्या उज्वल भविष्यासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्या जवानांना सलाम, असे भारताचा माजी सलामीवीर सेहवागे ट्विट केले. 


भारताचा माजी कसोटीपटू लक्ष्मण याने करगिल युद्धात वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या मातांना सलाम केला. 


ऑलिम्पिक पदकविजेत्या विजेंदरनेही 19 वर्षांपूर्वीच्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देताना शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.  



कुस्तीपटू योगेश्वर दत्तनेही श्रद्धांजली अर्पण केली. 

Web Title: KargilVijayDiwas: sports person tribute to Kargil War heroes on Vijay Diwas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.