Karim Benzema France: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या पराभवानंतर स्टार खेळाडू बेन्झेमाची निवृत्तीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 08:49 PM2022-12-19T20:49:30+5:302022-12-19T20:50:21+5:30

बेन्झेमाची कारकीर्द एका विशेष प्रकणामुळे वादग्रस्त ठरली होती

Karim Benzema retires from international football after France World Cup final defeat | Karim Benzema France: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या पराभवानंतर स्टार खेळाडू बेन्झेमाची निवृत्तीची घोषणा

Karim Benzema France: फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये फ्रान्सच्या पराभवानंतर स्टार खेळाडू बेन्झेमाची निवृत्तीची घोषणा

googlenewsNext

Karim Benzema announced his retirement: फुटबॉल वर्ल्ड कप फायनलमध्ये अतिशय अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अखेर लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा विजय झाला. सामना सुरूवातीच्या निर्धारित वेळेत २-२ अशा बरोबरीत आणि अतिरिक्त वेळेत प्रत्येकी १ गोल करत ३-३ अशा बरोबरी होता. पण मोक्याच्या क्षणी पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ असा फरक राखत अर्जेंटिनाने कायलिन एम्बाप्पेच्या फ्रान्सचा पराभव केला. अर्जेंटिनाने तिसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. फ्रान्सच्या पराभवानंतर संघाचा स्ट्रायकर करीम बेन्झेमा याने सोमवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली.

करीम बेन्झेमाने आपल्या ३६व्या वाढदिवसाच्या दिवशीच हा निर्णय जाहीर केला. त्याने लिहिले, “मी आज ज्या ठिकाणी पोहोचलो आहे तिथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. त्यात काही चुकाही झाल्या आहेत. पण तरीही मी ज्या उंचीपर्यंत पोहोचलोय त्याचा अभिमान आहे. मी माझी कथा स्वत: लिहिली आणि ही कथा आता संपत आहे." बेन्झेमाने फुटबॉलमधील सर्वोच्च बॅलोन डी’ओर पुरस्कार जिंकला आहे. पण मांडीच्या दुखापतीने विश्वचषकातून बाहेर पडण्यापूर्वी तो कतारमधील फ्रेंच संघाचा भाग होता.

बेन्झेमाची दमदार पण वादग्रस्त कारकीर्द

करीम बेन्झेमाने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि ९७ आंतरराष्ट्रीय सामन्यात ३७ गोल केले. फ्रेंच फुटबॉलला हादरवून टाकणाऱ्या सेक्स-टेप प्रकरणात ब्लॅकमेलमध्ये सहभागी असल्याचे आढळल्यानंतर बेन्झेमा पाच वर्षांसाठी राष्ट्रीय संघातून बाहेर होता. व्हर्साय कोर्टाने बेन्झेमाला गेल्या वर्षीच्या खटल्यात त्याला एक वर्षाचे निलंबन, तुरुंगवास आणि EUR 75,000 (USD 80,000) दंड ठोठावला. २०१५ मध्ये फ्रान्सचा संघ सहकारी मॅथ्यू वाल्ब्युएना याला ब्लॅकमेल करण्याच्या प्रकरणात गुंतल्याबद्दल दोषी ठरल्याने त्याला नुकसान भरपाई प्रति दंड लावण्यात आला होता. फ्रान्सचे प्रशिक्षक डिडिएर डेशॅम्प्स यांनी २०२१ मध्ये युरोपियन चॅम्पियनशिपच्या आधी त्याला संघात परत आणले. त्यावेळी सुपर-१६ फेरीत संघ बाहेर जाण्याआधी त्याने चार गोल केले होते.

Web Title: Karim Benzema retires from international football after France World Cup final defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.